Sanjay Raut। Devendra Fadnavis । Sharad Pawar : 2019 मध्ये अजित पवारांसोबत झालेला शपथविधी हा शरद पवारांशी चर्चा करून झाला होता, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. या विधानावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. खासदार संजय राऊत यांनी यावरून देवेंद्र फडणवीसांना उपचार घेण्याचा सल्ला दिलाय. राऊतांनी नववे आश्चर्य म्हणणं मोदी-शाहांनाही डिवचलं आहे. (Sanjay Raut Reaction On Devendra Fadnavis statement)
ADVERTISEMENT
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “शरद पवारांशी बोलून जर तो शपथविधी झाला असता, तर नक्कीच ते सरकार चाललं असतं. ते सरकार 72 तासांत कोसळलं नसतं. देवेंद्र फडणवीसांविषयी मी काय बोलू? अलिकडे मी त्यांची वक्तव्य पाहतोय. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाची प्रमुख लोक… देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावे आश्चर्य आहेत. आधीची आठ आश्चर्य जगात आहेत. दोन आश्चर्य दिल्लीत बसलेले आहेत. हे दहावं आश्चर्य हे महाराष्ट्रात आहे.”
फडणवीसांनी त्याचं वक्तव्ये पाहावं -संजय राऊत
संजय राऊत असंही म्हणाले की, “माणसानं किती खोटं बोलावं. मूळात मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेनेचा तुम्ही विश्वासघात केल्यामुळे… अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचं मान्य केलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी ब्लू सी मधील स्वतःचंच वक्तव्ये ते पाहावं. ते स्वतः काय बोलले? सत्तेचं वाटप 50-50 टक्के म्हणाले होते.”
Sharad Pawar: ‘फडणवीस सभ्य माणूस पण..’ पहाटेच्या शपथविधीवरुन पवारांनी सुनावलं
“त्यांनी विश्वासघात केल्यावर इतर कुणी आमचा विश्वासघात केला, असा गळा काढण्यात आता काय अर्थ आहे? अजून ते पहाटेच्या शपथविधीतून बाहेर पडलेले नाहीत. उद्या ते असं बोलतील की, सहा महिन्यांपूर्वी जो 40-50 आमदारांचा शपथविधी झाला, तोही शरद पवारांच्या सांगण्यावरून झाला”, असं म्हणत राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना चिमटा काढला.
पोटनिवडणुकीमुळे फडणवीसांचं विधान, राऊत नेमकं काय म्हणाले?
संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले, “एका वैफल्यातून ते बोलत आहेत. महाराष्ट्रात त्यांच्या सरकारबद्दल अत्यंत तिरस्कार आणि घृणा आहे. विधान परिषद निवडणुकीत त्यांना दारूण पराभव पत्करावा लागला. नागपूर-विदर्भात ते हरले. उद्या ज्या पोटनिवडणुका कसबा आणि चिंचवडमध्ये होत आहे, तिथे दारूण पराभव दिसत आहे. त्यामुळे लोकांची दिशाभूल करण्यासाठी अशी विधानं करत आहेत.”
Devendra Fadnavis यांनी डाव फिरवला; ‘तो’ शपथविधी शरद पवार यांच्याच संमतीने!
“अजित पवार हे ठामपणे, मजबूतीने महाविकास आघाडीचे नेते म्हणून महाराष्ट्रात एक वातावरण तयार करत आहेत. भाजपला आव्हान देत आहेत. आमच्या प्रतिमांना तडे देण्यासाठी अशा प्रकारची विधानं आपण कितीही केली, तरी लोकांचा विश्वास बसणार नाही”, असं प्रत्युत्तर राऊतांनी फडणवीसांना दिलं.
फडणवीसांनी कारणं शोधून उपचार घ्यावेत -संजय राऊत
“पहाटेच्या शपथविधीच्या आठवणीने अजूनही फडणवीसांना दचकून जाग येते. याची कारणं त्यांनी शोधली पाहिजे आणि उपचार करून घेतले पाहिजेत. महाराष्ट्रातील वातावरण हे मिंधे आणि फडणवीस सरकारच्या विरोधात आहे, त्याचा परिणाम असेल”, असा टोला राऊतांनी फडणवीसांना लगावला.
Shiv Sena फुटीमागे आप्पासाहेब धर्माधिकारी? ‘महाराष्ट्र भूषणला’ विरोध
फडणवीसांचं स्वप्न आम्ही पूर्ण होऊ दिलं नाही, संजय राऊतांनी त्या प्रकरणावर केलं भाष्य…
मूळात त्यांना अशी भीती का वाटावी की, त्यांना तुरुंगात टाकतील. असा त्यांनी कोणता गुन्हा वा कृत्ये केलं की, त्यांचं मन त्यांना खात होतं. आमच्या सगळ्यांचे फोन उद्धव ठाकरेंपासून, शरद पवार, संजय राऊतांपर्यंत… आमच्या सगळ्यांचे फोन रेकॉर्ड करून ऐकले जात होते. आणि हा फार मोठा गुन्हा आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यावरील कारवाई का थांबवली. चौकशी झाली असती. आल्याबरोबर ज्या चौकशा थांबवल्या त्यात फोन टॅपिंगची चौकशी थांबवली आहे. त्याच्यामुळे तुमची भीती, तुमचं मन तुम्हाला खातंय. महाविकास आघाडी सरकारकडून अटक झाली, तर सहानुभूतीची लाट निर्माण होईल असं स्वप्न त्यांना पडत होतं, पण आम्ही ते स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही”, असं विधानं संजय राऊतांनी केलं.
ADVERTISEMENT