उद्या महापालिकेच्या शिपायांवरही धाड टाकतील, संजय राऊत यांची जळजळीत टीका

मुंबई तक

• 05:53 AM • 25 Feb 2022

केंद्रीय तपास यंत्रणा उद्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या घरावर धाड टाकू शकतात, अशी उपरोधिक टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आज, सकाळी मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नगरसेवक यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने आज धाड टाकली. या धाडीवर टीका करताना संजय राऊत यांनी टीका केली. मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ […]

Mumbaitak
follow google news

केंद्रीय तपास यंत्रणा उद्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या घरावर धाड टाकू शकतात, अशी उपरोधिक टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आज, सकाळी मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नगरसेवक यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने आज धाड टाकली. या धाडीवर टीका करताना संजय राऊत यांनी टीका केली. मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली असल्याने अशा प्रकारच्या कारवाया होत असल्याचे त्यांनी सांगितले.

हे वाचलं का?

आता शिवसेना टार्गेटवर! यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्या घरी आयकर विभागाचे छापे

संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे या कारवाई होत आहेत. उद्या मुंबई महापालिकेच्या शिपयाच्या घरी धाड टाकण्यासाठी तपास यंत्रणा जातील असेही त्यांनी म्हटले. कारण बरेचसे शिपाई हे शिवसैनिक आहेत. ते शर्टवर शिवसेनेचा धनुष्यबाण लावतात. त्यामुळे उद्या त्यांच्यावरही धाडी टाकल्या जातील. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, पंजाब, छत्तीसगड या राज्यांना 2024 पर्यंत तपास यंत्रणांचा त्रास सहन करायचा असल्याचे त्यांनी सांगितले. 2024 नंतर पुढे पाहून घेऊ असेही राऊत यांनी म्हटले. सध्या राज्यात डर्टी पॉलिटिक्स सुरू असून आदित्य ठाकरेंनी उत्तर प्रदेशमध्ये तोच उल्लेख केला. तसंच ज्या प्रमाणे हिटलरच्या नाझी फौजा होत्या त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या आदेशावर तपास यंत्रणा काम करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.

…म्हणून पाठीमागून अफझलखानी वार… चालू द्या; संजय राऊत भडकले

राजकीय फायद्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणार, खोटे पुरावे तयार करणार, कॅबिनेट मंत्र्याला अटक करणार आणि तुम्हीच राजीनाम्यासाठी आंदोलन करणार. मुख्यमंत्र्यांनाही कोणाचा राजीनामा घ्यायचा याचा अधिकार आहे. त्याच अधिकारावर आम्ही नवाब मलिक यांचा राजीनामा घेतलेला नाही.

मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी जाधव यांच्या घरी आज सकाळी आयकर विभागानं छापे घातले आहेत. आयकर विभागाकडून त्यांच्या माझगाव येथील घरी चौकशी सुरु आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्षांच्या घरी आयकर विभागानं केलेली कारवाई म्हणजे, शिवसेनेला मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. परंतु, यशवंत जाधव यांच्यावरील ही कारवाई पहिल्यांदा झालेली नाही. यापूर्वीही यशवंत जाधव आयकर विभागाच्या रडारवर आले होते.

    follow whatsapp