पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना आढावा बैठकीत पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटचा मुद्दा उपस्थित करत बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडलं. त्यावरून राज्यात राजकीय वाद रंगला असून, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट मोदींवर टीकास्त्र डागलं आहे.
ADVERTISEMENT
संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत यांनी पंतप्रधान मोदींनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट संदर्भात मांडलेल्या भूमिकेबद्दल विचारण्यात आलं. त्यावर संजय राऊत म्हणाले, “कालच्या बैठकीबद्दल मी बोलणं योग्य नाही. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होती. पंतप्रधान कोरोना परिस्थितीबद्दल चर्चा करणार, अशीच चर्चा होती. पंतप्रधानांनी इतर विषयावरच जास्त तारा छेडल्या. ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, के.सी. राव यांची वक्तव्य बघितल्यानंतर कळेल की, तो एकतर्फी संवाद होता.”
PM Modi: ‘पेट्रोल-डिझेलवरील VAT कमी कराच’, PM मोदींनी महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना सुनावलं!
“बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना टोमणे मारण्याचं काम जास्त झालं. पंतप्रधानांकडून ही अपेक्षा नाही. व्हॅटसंदर्भात जो विषय झाला, तो अनावश्यक होता, असं बिगर भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी बाण्याला जागून जे काही सांगायचं होतं, ते सांगितलं आहे,” असं राऊत म्हणाले.
“बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची खंत आहे. पंतप्रधानांसोबत एकतर्फी संवाद झाला. जिथे भाजपचे मुख्यमंत्री नाहीत, त्यांच्यासोबत पंतप्रधानांची भूमिका वेगळी आहे. असं उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी यांच्यासह बिगर भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे.”
पेट्रोल-डिझेल महागाईला राज्य जबाबदार नाहीये; उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर
राज्यात २०१७ मध्येच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार होती, असं आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे. या तीन पक्षीय आघाडीबद्दल संजय राऊत म्हणाले, “मला असं वाटत नाही. कुणीतरी अफवा पसरवतंय. काय घडलं आणि काय घडणार आहे, हे मला माहिती आहे. कालच बोलत नाही. उद्या काय घडणार आहे, हे मला माहिती आहे. जुन्या पाचोळ्यावर पाय ठेवून कशाला आवाज करताय. असं काही घडलेलं नाही,” असं राऊत म्हणाले.
‘टीका करत नाहीये, विनंती करतोय’; मोदींचं ‘ते’ भाषण ज्यावरून राज्यात पेटलाय राजकीय वाद
कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना मात्र, पंतप्रधानांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांवरून बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना व्हॅट कमी करण्याचं आवाहन केलं. त्यावरून बिगर भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रावर निशाणा साधला.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?
पंतप्रधान मोदी या बैठकीत महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, झारखंड, तामिळनाडू या राज्यांची नावं घेतली होती. “केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आणि राज्यांनाही व्हॅट कमी करण्यास सांगितलं होतं. मात्र, अनेक राज्यांनी असं केलं नाही.”
“मी कुणावरही टीका करत नाहीये, तर तुमच्या राज्यातील लोकांच्या भल्यासाठी प्रार्थना करतोय. या राज्यांनी केंद्राची सूचना ऐकली नाही. ज्यांचं थेट ओझं सर्वसामान्यावर पडत आहे. या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे. जे नोव्हेंबर करायचं होतं, तो व्हॅट आता कमी करून राज्यांना लाभ मिळू द्या,” असं मोदी म्हणाले होते.
ADVERTISEMENT