संजय राऊत यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी 9 ते 10 तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांच्याविरोधात भाजपच्या नेत्यांचे स्फोटक वक्तव्य समोर येत आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याबाबतीत धक्कादायक विधाने केली आहेत. त्याचबरोबर आर्थर रोड जेलमध्ये नवाब मलिक यांचे शेजारी होण्याचा मान संजय राऊत यांना मिळणार, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं आहे. याचबरोबर किरीट सोमय्या यांनी इतर स्फोटक वक्तव्य संजय राऊत यांच्याबद्दल केले आहे.
ADVERTISEMENT
तत्पूर्वी पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरु होती. रविवारी सकाळी 7 वाजता ईडीचे एक पथक राऊतांच्या घरी दाखल झाले. सकाळी 7 वाजल्यापासून संजय राऊत यांची चौकशी सुरु होती. यादरम्यान शिवसैनिकांनी राऊत यांच्या मैत्री निवासस्थानासमोर मोठी गर्दी केली होती. शिवसैनिकांनी ईडीच्या विरोधात घोषणा देखील दिल्या. अखेर 8 ते 10 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊतांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेऊन ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले आहे.
यादरम्यान सर्वच स्तरावरून या कारवाईवर प्रतिक्रिया यायला सुरु झाल्या आहे. ईडीच्या कारवाईनंतर खुश होत किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ” माफिया पोलीस आयुक्त संजय पांड्ये यांच्या अटकेनंतर माफिया नेता संजय राऊत पोलिसांच्या ताब्यात. गोरेगाव पत्रा चाळ 1200 कोटींचा घोटाळा, वसई-नायगाव 2 हजार कोटींचा घोटाळा, अलिबागमध्ये जमीन, विदेश दौऱ्यादरम्यान संजय राऊत दुबईत कुणाला भेटले होते? या गोष्टी समोर आल्यास मला विश्वास आहे की, संजय राऊत यांना आर्थर रोड जेलमध्ये नवाब मलिक यांचे शेजारी बनण्याचा सन्मान मिळेल, असा दावा किरीट सोमयांनी केलाय.
पत्रा चाळ जमीन प्रकरण काय?
गोरेगावमधील पत्रा चाळ पुनर्विकासासाठी गुरू आशिष कन्स्ट्रक्शननं म्हाडासोबत करार केला होता. करारानुसार गुरू आशिष कन्स्ट्रक्शनला याठिकाणी 3,000 पेक्षा अधिक फ्लॅट बांधायचे होते. या एकूण फ्लॅटपैकी 672 फ्लॅट हे पत्रा चाळीतील रहिवाशांना दिले जाणार होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि गुरु आशिष फ्लॅटकडे राहणार होते.
पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊतांचं नावं कसं आलं?
प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मित्र असून, पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू असताना त्यांचं नावही समोर आले होतं. प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 55 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज दिल्याचं समोर आलं होतं. या कर्जाच्या रकमेतून राऊत कुटुंबानं दादरमध्ये फ्लॅट खरेदीसाठी केला होता. त्यानंतर ईडीने वर्षा आणि माधुरी राऊत यांचे जबाब नोंदवले होते.
ईडीतील सूत्रांच्या माहितीनुसार 2010 मध्ये प्रवीण राऊत यांना त्याच्या बँक खात्यात इक्विटी आणि जमीन व्यवहाराच्या नावाखाली 95 कोटी रुपये मिळाले होते, तरीही कंपनी प्रकल्प पूर्ण करू शकली नाही आणि कोणतेही उत्पन्न मिळाले नाही.या प्रकरणात ईडीने ज्यांच्या निवासस्थानाची झडती घेतली ते सुजित पाटकर हे प्रवीण राऊत यांचे सहकारी आहेत, तर संजय राऊत यांच्याशी जवळचे संबंध आहेत. पाटकर हे संजय राऊत यांच्या मुलींसह वाईन ट्रेडिंग फर्ममध्ये गेल्या वर्षभरापासून भागीदार आहेत. पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने यापूर्वी अलिबाग येथे संयुक्तपणे जमीन खरेदी केली होती.
या प्रकरणात ईडीने ज्यांच्या निवासस्थानाची झडती घेतली ते सुजित पाटकर हे प्रवीण राऊत यांचे सहकारी आहेत, तर संजय राऊत यांच्याशी जवळचे संबंध आहेत. पाटकर हे संजय राऊत यांच्या मुलींसह वाईन ट्रेडिंग फर्ममध्ये गेल्या वर्षभरापासून भागीदार आहेत. पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने यापूर्वी अलिबाग येथे संयुक्तपणे जमीन खरेदी केली होती.
ADVERTISEMENT