पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाची जिल्हा बँक असलेल्या सातारा जिल्हा बँकेच्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. अखेर निकालाची प्रतिक्षा संपली असून, साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मतानं पराभव झाला आहे. दुसरीकडे शंभुराजे देसाई यांनाही पराभव स्वीकारावा लागला आहे.
ADVERTISEMENT
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत चारही राजे बिनविरोध निवडले गेल्याने आमदार शशिकांत शिंदे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, शंभुराजे देसाई, माणचे मनोज पोळ, खटावचे नंदकुमार मोरे, कोरेगावचे शिवाजीराव महाडिक, पाटणचे सत्यजितसिंह पाटणकर यांच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष होतं. निकाल समोर आले असून, शशिकांत शिंदे आणि शंभुराजे देसाई यांचा पराभव झाला आहे. तर बाळासाहेब पाटील यांचा विजय झाला आहे.
जावली मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांच्याविरोधात ज्ञानेश्वर रांजणे यांनी अर्ज भरला होता. रांजणे यांची शेवटपर्यंत मनधरणी करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून झाले. मात्र, त्यांनी माघार घेतली नाही. जावली मतदारसंघातून 25 मतं घेत रांजणे यांनी शशिकांत शिंदेंना एका मताने पराभूत केलं आहे. एकूण मते 49 होती. त्यापैकी 48 मतं वैध ठरली. शिंदे यांना 24 मते मिळाली, तर रांजणे यांना 25 मते मिळाली.
गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई पराभूत
सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाईही होते. पाटण मतदारसंघातून देसाई यांच्याविरोधात सत्यजित पाटणकर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. निवडणुकीत पाटणकर यांनी देसाईंना मात देत तब्बल 14 मतांनी पराभूत केलं आहे. देसाई यांना 44 मते मिळाली, तर पाटणकर यांना 58 मते मिळाली आहेत.
खटाव आणि माणम मतदारसंघात दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाली आहेत. माणमध्ये मनोज पोळ आणि शेखर गोरे मैदानात होते. दोघांनाही 36 मतं पडली. तर कोरेगाव मतदारसंघातून शिवाजीराव महडिक आणि सुनील खत्री यांनी निवडणूक लढवली. दोघांनाही प्रत्येकी 45 मते मिळाली. त्यामुळे दोन्ही ठिकाणी आता चिठ्ठी पद्धतीने निकाल घोषित करण्यात येणार आहे.
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील विजयी
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील कराड मतदारसंघातून मैदानात उतरले होते. त्यांच्याविरोधात उदयसिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरलेला होता. यात पाटील यांना 74 मतं मिळाली, तर उदयसिंह पाटील यांना 66 मतं मिळाली. दुसरीकडे खटाव मतदारसंघातून नंदकुमार मोरे यांना 46 मतं मिळाली असून, प्रभाकर घार्गे यांना 56 मतं मिळाली. प्रभाकर घार्गे विजयी झाले आहेत.
जावली –
ज्ञानदेव रांजणे-25
शशिकांत शिंदे-24
ज्ञानदेव राजणे 1 मताणी विजयी
एकूण-69 मतदान
कराड –
उदय सिंह विलास पाटील उंडाळकर-66
बाळासाहेब पाटील-74
बाळासाहेब पाटील 8 मताणी विजयी
एकूण मतदान – 332
पाटण –
सत्यजित पाटणकर – 58
शंभुराजे देसाई – 44
सत्यजित पाटणकर 14 मताणी विजयी
एकूण मतदान – 203
कोरेगाव –
शिवाजीराव महाडीक – 45
सुनील खत्री – 45
समान मते
एकूण मतदान – 130
खटाव –
प्रभाकर घार्गे-56
नंदकुमार मोरे-46
प्रभाकर घार्गे 10 मताणी विजयी
एकूण मतदान-150
माण –
शेखर गोरे-36
मनोजकुमार पोळ-36
समान मत
एकूण मतदान-110
नागरी बँक/नागरी सहकारी बँक
रामराव लेंभे-307
सुनील जाधव-47
रामभाऊ लेंभे 260 मताणी विजयी
एकूण मतदान-374
इतर मागासवर्गीय सदस्यशेखर गोरे-379
प्रदीप विधाते-1459
प्रदीप विधाते 1080 मतानी विजयी
एकूण मतदान-1838
निकाल बाकी
महिला प्रतिनिधी
कांचन साळुंखे-
शारदादेवी कदम-
एकूण मतदान-1964
ऋतुजा पाटील –
चंद्रभागा काटकर-
एकूण मतदान-1964
ADVERTISEMENT