बेडरुममध्ये छुपा कॅमेरा लावून पत्नीचं गुप्त रेकॉर्डिंग केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. या प्रकरणी पत्नीने पतीविरोधात सातारा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पती विरोधात तिने तक्रार दिली आहे. बेडरूममध्ये छुपा कॅमेरा लावून गुप्त व्हीडिओ रेकॉर्डिंग करण्यात आलं.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेली माहिती काय?
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला ३४वर्षांची असून, ती एका रुग्णालयात काम करते. बोअरवेल गाडी घेण्यासाठी पतीकडून तगादा सुरू होता. या कारणावरून पत्नीचा जाचहाट सुरू होता. पतीचे विवाहबाह्य संबंधाबाबत पत्नीने विचारणा केली असता मुलांना विष देऊन जीव देर्इन आणि तुझ्या वडिलांना खडी फोडायला पाठवीन, अशी वारंवार धमकी देत होता. एवढेच नव्हे तर पत्नी ज्या रुग्णालयात काम करते. त्या रुग्णालयात जाऊन दंगा करेन, अशी धमकीही देत असत. एके दिवशी बेडरुममध्ये पतीने छुपा कॅमेरा बसवून पत्नीचे गुप्त व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं. हा प्रकार समोर आल्यानंतर पत्नीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित पतीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
महिला पोलिसांकडे सोपवण्यात आलं प्रकरण
बेडरूममध्ये छुपा कॅमेरा लावून पतीने पत्नीचं गुप्त रेकॉर्डिंग केलं. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तिला धक्का बसला. पत्नीने सातारा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला. तक्रारीनंतर पोलिसांनी पीडितेच्या पतीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातली संवेदनशीलता लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास महिला पोलिसांकडे देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT