सातारा: ‘तुम्ही शिवसेनेचं बोट धरुनच मोठे झालात विसरु नका’, चंद्रकांत पाटलांना कोणी दिलं प्रत्युत्तर?

मुंबई तक

• 06:33 AM • 10 Dec 2021

सातारा: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फलटणच्या कार्यक्रमात जोरदार निशाणा साधला होता. ‘देशाच्या राजकारणात जायचं असेल तर, घराच्या बाहेर पडावं लागतं.’ अशा पद्धतीची टीका त्यांनी मुख्यमंत्र्यावर केली होती. आता त्यांच्या याच टीकेला गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. साताऱ्यातील पत्रकार परिषदेत बोलताना शंभुराज देसाई यांनी चंद्रकांत पाटलांवर हल्ला चढवला […]

Mumbaitak
follow google news

सातारा: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फलटणच्या कार्यक्रमात जोरदार निशाणा साधला होता. ‘देशाच्या राजकारणात जायचं असेल तर, घराच्या बाहेर पडावं लागतं.’ अशा पद्धतीची टीका त्यांनी मुख्यमंत्र्यावर केली होती. आता त्यांच्या याच टीकेला गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. साताऱ्यातील पत्रकार परिषदेत बोलताना शंभुराज देसाई यांनी चंद्रकांत पाटलांवर हल्ला चढवला आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या या आरोपांना कोणताही आधार नाही. तसंच चंद्रकांत पाटील हे सगळं त्यांना आलेल्या नैराश्यातून बोलत असून वेगवेगळ्या वल्गना करत आहेत.’ असं म्हणत शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हे वाचलं का?

‘तुमचे महाराष्ट्रात निवडून आलेले खासदार सुद्धा आमच्या जीवावरच निवडून आले आहेत. त्यामुळं आमच्यावर असे आरोप करु नका.’ असंही शिवसेना नेते शंभुराज देसाई यांनी चंद्रकांत पाटलांना ठणकावून सांगितलं आहे.

‘महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंच बोट धरुनच भारतीय जनता पक्ष पुढं आला आहे हे विसरु नका. बाळसाहेब ठाकरेंच बोट धरुनच ग्रामीण भागात तुमचा पक्ष वाढलाय हे माहती करुन घ्यायचं असेल तर अडवाणींना विचारा.’ असा सल्ला सुद्धा त्यांनी चंद्रकांत पाटील यांना दिला आहे.

‘महाराष्ट्रात भाजपाची आत्ताची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना या सगळ्या गोष्टीचं विस्मरण झालं का?’ असा सवालही शंभुराज देसाई यांनी केला आहे.

‘आमच्या 18 खासदारांवर तुम्ही बोलू नका. निवडणुकीत युती असल्यामुळं प्रत्येकानं प्रत्येकाला मदत केल्यामुळंच दोघांचे खासदार निवडून आले आहेत. शिवसेनेच्या जीवावर सुद्धा भाजपाचे खासदार निवडुन आलेत हे विसरु नका. आता पुढच्या निवडणुकीत शिवसेना भाजपाला जागा दाखवून देईल. असा इशाराही शंभुराज देसाई यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

पाहा शंभुराज देसाई नेमकं काय म्हणाले

‘सातारा जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी एक कार्यक्रम झाला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्या कार्यक्रमात भाषण करताना शिवसेनेवर आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाहक अशा पद्धतीची टीका केली. माझ्या जिल्ह्यामध्ये येऊन त्यांनी त्या अनुषंगाने काही बोलले असते तर त्यावर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नव्हती. परंतु शिवसेना पक्षप्रमुखांबाबत जे वक्तव्य केलं आहे त्याला कोणताही आधार नाही.’

‘गेली दोन महाविकास आघाडीचं सरकार जे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या दिवसापासून भाजपचे हरएक नेते त्यात चंद्रकांत पाटील देखील आहेत. ते सातत्याने म्हणत होते, दोन महिन्यात हे सरकार जाणार, कधी म्हणत होते सहा महिन्यात जाणार. अशा अनेक तारखा त्यांनी दिल्या. पण त्यांना हे शक्य झालं नाही.’

‘गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात अनेक नैसर्गिक संकटं आली. पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात त्याच धाडसाने आम्ही सामना केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा महाराष्ट्राचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे.’

मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेनं सगळा पक्ष संपवला -चंद्रकांत पाटील

‘मला ही बाब अधोरेखित करायची आहे की, जेव्हा चंद्रकांतदादा म्हणतात की, 18 खासदारांच्या जीवावर तुम्ही देशाचं नेतृत्व करायला निघाला आहात मला त्यांना या गोष्टीची आठवण करुन द्यायची आहे की, तुमच्या पक्षाचे एकेकाळी दोनच खासदार संसदेत होते. नंतरच्या काळात तुम्ही सगळ्या मित्र पक्षांशी मदत घेऊन तुम्ही सुद्धा केंद्रात सरकार स्थापन केलं.’ असं म्हणत शंभुराज देसाई यांनी चंद्रकांत पाटलांना तात्काळ प्रत्युत्तर दिलं आहे.

    follow whatsapp