Satyajeet Tambe: गेम नेमका कोणाचा झाला, तांबे पिता-पुत्रांचा की..?

मुंबई तक

12 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:17 AM)

Satyajeet Tambe filling independent form Vidhan Parishad 2023: मुंबई: ‘शक्य तितकी जोखीम घ्या. जिंकलात, तर नेतृत्व कराल. हरलात, तर मार्गदर्शन कराल.’ काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी आज (12 जानेवारी) स्वामी विवेकानंदांच्या जयंती निमित्त खास ट्विट केलं. ज्यानंतर सर्वांचाच भुवया उंचावल्या होत्या. मात्र, आज ज्या पद्धतीने राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाले त्यानंतर आता सत्यजित तांबेंच्या […]

Mumbaitak
follow google news

Satyajeet Tambe filling independent form Vidhan Parishad 2023: मुंबई: ‘शक्य तितकी जोखीम घ्या. जिंकलात, तर नेतृत्व कराल. हरलात, तर मार्गदर्शन कराल.’ काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी आज (12 जानेवारी) स्वामी विवेकानंदांच्या जयंती निमित्त खास ट्विट केलं. ज्यानंतर सर्वांचाच भुवया उंचावल्या होत्या. मात्र, आज ज्या पद्धतीने राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाले त्यानंतर आता सत्यजित तांबेंच्या याच ट्विटबाबत वेगवेगळे राजकीय अर्थही काढले जात आहेत. (satyajeet tambe filling independent form in nashik graduate constituency election vidhan parishad)

हे वाचलं का?

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (nashik graduate constituency election) अखेर सत्यजित तांबेंनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे, थोरात-तांबे कुटुंबात तेढ निर्माण होऊ शकतो का? की काँग्रेसकडूनच तांबे पिता पुत्राचा गेम झाला का अशी जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत सुधीर तांबे अर्ज भरणार की सत्यजित तांबे हे निश्चित नव्हतं. काँग्रेसनं सुधीर तांबेंना अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे, तांबेंच्या नावानं AB फॉर्म आला. मात्र, सुधीर तांबेंनी अर्जच भरला नाही. उलट सोबत असलेले त्यांचे सुपुत्र सत्यजीत तांबेंनीच अपक्ष म्हणून अर्ज भरला.

नाशिक विधान परिषद: सर्वात मोठी बातमी, सत्यजीत तांबेंनी भरला अपक्ष फॉर्म

यानंतर माध्यमांशी बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले की, ‘काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आणि आमच्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचीच इच्छा होती की, मी निवडणूक लढवली पाहिजे. परंतु काही तांत्रिक कारणं किंवा विसंवादामुळे मला माहित नाही.. पण डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर झाली.पण माझी उमेदवारी ही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आहे.’

सत्यजीत तांबेंना आपल्याला काँग्रेसकडून उमेदवारी का मिळाली नाही, याचं कारण स्वतःच सांगितलं. काँग्रेसचा सारा कारभार चव्हाट्यावर आणला. कुणीतरी मिस कम्युनिकेशन करत होत, या मुद्यावरही बोट ठेवलं. काँग्रेसमध्ये मिस कम्युनिकेशन असलं तरी तांबे पिता पुत्रांमध्ये कोणताही विसंवाद नसल्याचीच गोष्ट यानिमित्तानं अधोरेखित केली.

सत्यजीत तांबे अपक्ष मैदानात : भाजप पाठिंबा देणार? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

दुसरीकडे सत्यजित तांबेंना काँग्रेसमध्ये मोठ्या पदाची अपेक्षा आहे. मात्र, त्यांना तशी संधी मिळू शकलेली नाही. काही दिवसांपूर्वी सत्यजित तांबेंच्या सिटीझनविल पुस्तकाचा अनुवाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी फडणवीसांनी तांबेंना मामा बाळासाहेब थोरातांसमोरच भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सत्यजित तांबे भाजपमध्ये जाणार का? या चर्चांना सुरुवात झाली. पण, आज अखेरच्या क्षणी कहाणीत ट्विस्ट आला.

वडील सुधीर तांबेंनी माघार घेतली आणि मुलाच्या महत्वाकांक्षेला साथ दिली. काँग्रेसनं उमेदवारी देऊनही पित्याने माघार घेत मुलाला चाल दिली. पण यात तांबे पितापुत्रांच्या या निर्णयाने काँग्रेसचं नेतृत्व चांगलंच तोंडघशी पडलं आहे. इतक्या सगळ्या घडामोडी घडत असताना सत्यजित तांबेंचे मामा बाळासाहेब थोरात हे उपचारांसाठी मुंबईत आहेत. त्यांची यावर प्रतिक्रियाही आलेली नाही. आजच्या या ट्विस्टमुळे या चर्चांवर पडदा पडलाय की आणखी काही सरप्राईज बाकी आहे, हे येणारा काळच ठरवेल.

मात्र, या प्रकरणात काँग्रेसनं तांबे पिता-पुत्रांचा गेम केला की तांबेंनी काँग्रेसचा गेम केला याची चर्चा आता जोरदार सुरू आहे. पण नेमका कुणाचा गेम झाला हे आता येत्या काळात नक्कीच स्पष्ट होईल.

    follow whatsapp