ज्ञानवापी वाद: नमाज पठणाचा अधिकार न काढता शिवलिंग सुरक्षित ठेवा-सुप्रीम कोर्ट

मुंबई तक

• 03:30 PM • 17 May 2022

काशी मधल्या ज्ञानवापी मशिदीचा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे जर तिथे शिवलिंग आढळल्याचा दावा केला जातो आहे. तो खरा असेल तर मुस्लिमांचा प्रार्थनेचा अधिकार जाता कामा नये. त्यांना तिथे नमाज पठण करता आलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने खालच्या कोर्टाला हे सांगितलं आहे की तिथे शिवलिंग मिळालं असेल तर त्याची […]

Mumbaitak
follow google news

काशी मधल्या ज्ञानवापी मशिदीचा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे जर तिथे शिवलिंग आढळल्याचा दावा केला जातो आहे. तो खरा असेल तर मुस्लिमांचा प्रार्थनेचा अधिकार जाता कामा नये. त्यांना तिथे नमाज पठण करता आलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने खालच्या कोर्टाला हे सांगितलं आहे की तिथे शिवलिंग मिळालं असेल तर त्याची सुरक्षा राखा पण मुस्लिमांचा नमाज पठणाचा अधिकार जाता कामा नये असं कोर्टाने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

यानंतर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की वजूखान्यामध्ये जे शिवलिंग मिळालं आहे ती हात पाय धुण्याची जागा आहे. नमाज पठण करण्याची जागा वेगळी असते. सुप्री कोर्टाने या प्रकरणी गुरूवार पर्यंत सुनावणी स्थगित केली आहे.

कोर्टाने हेदेखील म्हटलं आहे की खालच्या कोर्टाने याचिका दाखल केली होती त्याचा निपटारा करावा. यावर मुस्लिम पक्षाचे वकील म्हणाले की तुम्ही तो परिसर कसा काय सील करू शकता? आमची बाजू ऐकून घेतल्या शिवाय IA पास करण्यात आला. हे सगळे आदेश अवैध आहेत. आमचं काहीही ऐकून न घेता आमची संपत्ती सील केल्यासारखं हे आहे. आता मशिदीत नमाज पठणाची जागाही सीमीत करण्यात येते आहे.

मुस्लिम पक्षाचं हे म्हणणं आहे वाराणसी येथील कोर्टाने या प्रकरणी कोणताही आदेश द्यायला नको होतो. मुस्लिम पक्षाने कोर्टाने हे सांगितलं की मशिदीतला परिसर सील करण्यात यावा हा आदेश दिल्याने अनेक ठिकाणी धार्मिक कॅरेक्टर बदलतं आहे. पूजा स्थळ अधिनियम आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या अयोध्या निर्णयाचं हे उल्लंघन आहे. सुप्रीम कोर्टात मुस्लिम पक्षाने परिसर सील करण्याच्या सिव्हिल कोर्टाच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली आहे.

ज्ञानवापी मशिदीचं सर्वेक्षण पूर्ण, परिसरातल्या विहिरीत शिवलिंग आढळल्याचा दावा

ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात कथित रूपाने शंकराची पिंड आढळल्याने हिंदू पक्षाने हर हर महादेवचा जयजयकार करण्यात आला. ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात शिवलिंग मिळाल्याची बाब समोर येताच हिंदू पक्ष सक्रिय झाला असून त्यांनी तातडीने शिवलिंगाच्या संरक्षणासाठी कोर्टाकडे अर्ज केला आहे. कोर्टाने हिंदू पक्षाचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर तातडीने शिवलिंगाच्या सुरक्षेसंदर्भातले आदेश दिले आहेत.

कोर्टाने जो आदेश दिला आहे त्यानुसार या शिवलिंगाजवळ कुणालाही फिरकण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी आता कुणीही येऊ-जाऊ शकत नाही. वजू या ठिकाणावरही बंदी घालण्यात आली आहे. एवढंच नाही तर ज्ञानवापी मशिदीत आता केवळ २० लोक नमाज पठण करू शकतात असंही कोर्टाने म्हटलं आहे. हिंदू पक्षाने केलेला मोठा दावा आणि कोर्टाचा आदेश असं सगळं असूनही मुस्लिम पक्ष हे म्हणतो हे की शिवलिंग मिळाल्याची बाब योग्य नाही. हिंदू पक्षाचे सगळे दावे मुस्लिम पक्षाने खोडून काढले आहेत.

    follow whatsapp