Solpapur जिल्ह्यातल्या 450 Corona मुक्त गावांमधल्या 83 शाळांमध्ये वाजली शाळेची घंटा

मुंबई तक

• 07:14 AM • 12 Jul 2021

सोलापूर जिल्ह्यात ज्या गावांमध्ये एक महिन्यापासून कोरोना नाही अशा 450 गावांमधील 83 ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत.आज मुख्य कार्याकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. आज सुरू झालेल्या 8 ते 12 वर्गांसाठी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दक्षिण सोलापूर येथील एस.व्ही.सी.एस शाळेत मुख्याधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्या […]

Mumbaitak
follow google news

सोलापूर जिल्ह्यात ज्या गावांमध्ये एक महिन्यापासून कोरोना नाही अशा 450 गावांमधील 83 ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत.आज मुख्य कार्याकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. आज सुरू झालेल्या 8 ते 12 वर्गांसाठी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

हे वाचलं का?

दक्षिण सोलापूर येथील एस.व्ही.सी.एस शाळेत मुख्याधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत विधर्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळा प्रशासनाकडून देखील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे तापमान तपासणी करण्यात आले. हातावर सॅनेटाझर्स फवारण्यात आले. वर्गामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवून बैठक व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी भेट दिलेले मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी विद्यार्थ्यांना शाळा सुरू करायची का? तयारी झाली का असे प्रश्न विचारले ? यावर विद्यार्थ्यांनी सुरू करायची असा एकच नारा दिला.

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आत्ता काहीशी ओसरते आहे. तरीही डेल्टा प्लस व्हेरिएंट आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये लेव्हल ३ चे निर्बंध आहेत. कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी प्रशासनाकडून कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत. एवढंच नाही तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोरोनाचे निर्बंध असले तरीही अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी अनेक उद्योग आणि व्यवसायांनाही मुभा देण्यात आली आहे. अत्यावशक सेवांसोबतच अनावश्यक सेवांमधलीही दुकानं दुपारी 2 किंवा 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा विविध जिल्ह्यांमध्ये देण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या 8 जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोनाची स्थिती काहीशी काळजी करण्यासारखी आहे.

त्यामुळे या आठ जिल्ह्यांमधला कोरोना कमी कसा करता येईल यावर भर दिला जातो आहे. अशात आता सोलापूर जिल्ह्यातल्या 450 गावांमधल्या 83 शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना प्रोटोकॉल पाळून शाळा सुरू करण्यात आली आहे. कोरोनाची पहिली लाट आली त्यावेळी मार्च 2020 महिन्यात शाळा आणि महाविद्यालयं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशात आता महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या 83 शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोना संसर्ग होणार नाही आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल असे नियम पाळूनच शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

    follow whatsapp