रामदेवबाबांना झटका, महाराष्ट्रात कोरोनिलच्या विक्रीवर बंदी

मुंबई तक

• 11:55 AM • 23 Feb 2021

योगगुरू रामदेवबाबा यांच्या पतंजली या कंपनीने तयार केलेल्या कोरोनिल या औषधाच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. हे औषध कोरोनावर प्रभावी आहे असा दावा रामदेवबाबांनी केला होता. तसंच या औषधाला WHO ने मान्यता दिल्याचंही म्हटलं होतं. मात्र अशी कोणतीही मान्यता दिली नसल्याचं WHO अर्थात जागतिक आरोग्य संस्थेने स्पष्ट केलं आहे. ज्यानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख […]

Mumbaitak
follow google news

योगगुरू रामदेवबाबा यांच्या पतंजली या कंपनीने तयार केलेल्या कोरोनिल या औषधाच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. हे औषध कोरोनावर प्रभावी आहे असा दावा रामदेवबाबांनी केला होता. तसंच या औषधाला WHO ने मान्यता दिल्याचंही म्हटलं होतं. मात्र अशी कोणतीही मान्यता दिली नसल्याचं WHO अर्थात जागतिक आरोग्य संस्थेने स्पष्ट केलं आहे. ज्यानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या औषधाबाबत निर्णय घेतला आहे. या औषधावर जर इंडियन मेडिकल असोसिएशननेच प्रश्न उपस्थित केले आहेत तर मग हे औषध बाजारात इतक्या घाईमध्ये आणणं योग्य ठरणार नाही. तसंच जागतिक आरोग्य संस्था, आयएमए व इतर संबंधित मान्यताप्राप्त आरोग्य संस्थांकडून प्रमाणीकरण झाल्याशिवाय कोरोनिल औषधाच्या विक्रीला महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही असंही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

हे वाचलं का?

कोरोनिल का आहे वादात?

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत कोरोनिल हे औषध आणण्यात आलं. सुरूवातीला हे औषध रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यााठी असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आता हे औषध कोरोना हा रोग बरा करू शकतं असा दावा करण्यात आला. यासाठी या औषधाला WHO ने मान्यता दिल्याचंही सांगण्यात आलं. यावरून IMA अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉ. हर्षवर्धन यांच्यावर तिखट शब्दांमध्ये टीका केली आहे.

IMA ने डॉ. हर्षवर्धन यांना काय प्रश्न विचारले आहेत?

तुम्ही आरोग्यमंत्री आहात मग देशासमोर असे खोटे दावे करणं कितपत योग्य आहे?

तुम्ही केंद्रीय आरोग्यमंत्री आहात, चुकीची आणि अशास्त्रीय दावे असलेली गोष्ट लोकांसमोर लाँच कशी काय करू शकता?

तुम्ही डॉक्टर असूनही जनसामान्यांच्या समोर कोणत्याही शास्त्राचा आधार नसलेली गोष्टी प्रमोट कशी काय करू शकता?

तुम्ही कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या ज्या औषधाची जाहिरात केलीत त्याची चाचणी कधी आणि केव्हा झाली याची माहिती द्या

या औषधाची चाचणी कशा प्रकारे करण्यात आली ?

या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलसाठी किती स्वयंसेवक हजर होते आणि चाचणी नेमकी कुठे करण्यात आली ?

हे सगळे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या औषधाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. योग्य प्रमाणीकरण होत नाही तोपर्यंत हे औषध बाजारात विकता येणार नाही असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp