ज्येष्ठ संस्कृत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांचं निधन झालं आहे. आज दुपारी दीड वाजता त्यांनी घरी अखेरचा श्वास घेतला सोडला. गेल्या महिन्यापासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा बदिउज्जमा बिराजदार असून ते नावाजलेले गझलकार साबीर शोलापुरी या नावाने प्रसिद्ध आहेत.
ADVERTISEMENT
बिराजदार हे मूळचे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील आहेत. सोलापुरातील महानगरपालिकेच्या संस्कृत शाळेत त्यांचं शिक्षण झालं. पुढे त्यांनी वेदांचा अभ्यास केला आणि त्यात प्राविण्य मिळवलं. बिराजदार यांनी मुसलमानांचा कुराण-शरीफ हा पवित्र ग्रंथ संस्कृतमध्ये भाषांतरीत केला आहे. या ग्रंथात एकूण 600 पाने आहेत.
बिराजदार यांना एकूण 18हून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. यामध्ये राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार केंद्र शासन, संस्कृत-पण्डित्याय राष्ट्रपति पुरस्कार तसंच महाराष्ट्र राज्य-संस्कृत-पण्डित-पुरस्कार: महाराष्ट्र विधानसभा यांचा समावेश आहे. पंडित बिराजदार हे औरंगाबाद येथे जानेवारी 2018 मध्ये झालेल्या तीन दिवसीय वैदिक संमेलनाचं खास निमंत्रण होते. वेदाचे अभ्यासक व संस्कृत पंडित म्हणून तेथे 21 जोनवारी 2018 रोजी झालेल्या समारोप कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.
अमेरिकेत 20 लाख लोक संस्कृतचा अभ्यास करीत आहेत. संस्कृत ही आपल्या देशाची भाषा असून संस्कृतचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी बिराजदार यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT