सीरमचे सीईओ अदर पूनावाला यांचे लसीच्या उत्पादनाबाबत दावे ठरत आहेत फोल?

मुंबई तक

• 12:12 PM • 10 May 2021

मुंबई: भारतात (India) कोरोना (Corona) संसर्ग वाढल्यानंतर त्यावर लस शोधण्याचं काम हे जोमानं सुरु झालं होतं. त्यात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) सगळ्यांनाच एक आशेचा किरण दाखवला होता. सीरम इन्स्टिट्यूटने मोठ्या प्रयत्नअंती कोव्हिशिल्ड (covishield) ही बाजारात आणली होती. जेव्हा या लसीच्या वापराला परवानगी मिळाली होती तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की, […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: भारतात (India) कोरोना (Corona) संसर्ग वाढल्यानंतर त्यावर लस शोधण्याचं काम हे जोमानं सुरु झालं होतं. त्यात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) सगळ्यांनाच एक आशेचा किरण दाखवला होता. सीरम इन्स्टिट्यूटने मोठ्या प्रयत्नअंती कोव्हिशिल्ड (covishield) ही बाजारात आणली होती. जेव्हा या लसीच्या वापराला परवानगी मिळाली होती तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की, सीरम इन्स्टिट्यूट मोठ्या प्रमाणात लसीच उत्पादन करेल. यावेळी ही लस फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील इतर देशांना देखील पुरवली जाईल. पण आता साधारण चार महिन्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांचे हे दावे फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे.

हे वाचलं का?

गेल्या वर्षभरात अदर पूनावाला यांनी अतिशय आत्मविश्वासाने सांगितलं होतं की, त्यांची कंपनी मोठ्या प्रमाणात कोव्हिशिल्डचं उत्पादन करेल. ऑक्टोबर 2020 मध्ये ते म्हणाले की, SIIने साठवणुकीच्या उद्देशाने सुमारे 5 कोटी डोस तयार केले आहेत. जानेवारीपर्यंत त्यांची कंपनी एकूण 10 कोटी डोस तयार करेल. दरम्यान, एका महिन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सीरमच्या मुख्यालयाला भेट दिली होती तेव्हा पूनावाला म्हणाले होते की, मार्च महिन्यापर्यंत त्यांची कंपनी 10 कोटी डोसची दर महिन्याला निर्मिती करेल. मात्र, आता मे महिना उजाडला आहे आणि SIIची उत्पादन क्षमता ही दर महिन्याला सुमारे 7 कोटी डोस इतकीच राहिली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पूनावाला यांनी असं म्हटलं होतं की, ‘एका महिन्यात आम्ही 6 ते 7 कोटी डोस तयार करतो. ही क्षमता 10 कोटी पर्यंत नेण्यासाठी आम्हाला जुलै महिना उजाडणार आहे. केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सगळ्यांना लसीकरणाची घोषणा केल्यानंतरच तुटवडा भासतो आहे. हा तुटवडा येते तीन महिने तरी भासणार आहे.’ असं वक्तव्य अदर पूनावाला यांनी केलं होतं.

Vaccine Shortage वर अदर पूनावाला म्हणतात देशात या महिन्यापर्यंत राहणार तुटवडा

जानेवारी महिन्यात पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटच्या एका प्लांटला आग लागली होती. ज्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनेच्या वेळी पूनावाला म्हणाले होते की, या आगीच्या प्लांटमध्ये कोव्हिड प्रतिबंधक लसी या सुरक्षित आहेत आणि आगीचा लसीच्या उत्पादनावर कोणताही परिणाम होणार नाही.

धमकीचे फोन, बड्या लोकांकडून दबाव…अदर पूनावाला देशाबाहेर लस उत्पादन करण्याच्या विचारात

दरम्यान, अदर पूनावाला यांनी एप्रिल महिन्यात CNBC-TV18 ला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं होतं की, सीरमला लागलेल्या आगीमुळे लसीच्या पुरवठ्यात करण्यात आम्हाला विलंब होत आहे. दरम्यान, 1 मे रोजी त्यांनी ‘द टाइम्स’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देखील याचा पुनरुच्चार केला होता. यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, ‘एप्रिल ते जुलै या कालावधीत उत्पादन 10 कोटीपर्यंत पोचविण्याचं आमचं जे लक्ष्य होतं त्याला कुठेतरी धक्का बसला आहे.’

सध्या, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत भारताला लसीकरण हे अत्यंत गरजेचं असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर लस उपलब्ध करुन देणं यासाठी पूनावाला यांच्यावर बराच दबाव आहे. पण आता पूनावाला यांनी उत्पादनात होणाऱ्या विलंबाची अनेक कारणे दिली आहेत.

Serum Institute च्या अदर पूनावालांनी पत्रक काढून मांडली बाजू, म्हणाले…

कंपनीच्या प्लांटला आग लागल्यामुळे लसी उत्पादनात विलंब होत असल्याचं एक कारण अदर पूनावाला यांनी आधीच दिलं होतं. त्यानंतर त्यांनी लस बनविण्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे त्या कच्च्या मालाची निर्यात अमेरिकेकडून योग्य प्रमाणात होत नसल्याचं म्हटलं होतं. अमेरिकन सरकारच्या या निर्णयामुळे लस उत्पादनास त्रास होत असल्याचंही अदर पुनावाला यांनी म्हटलं होतं. 16 एप्रिल रोजी त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन यांना टॅग करुन तसं ट्विट देखील केलं होते.

पण त्यानंतर लागलीच पूनावाला यांनी असं म्हटलं की, कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे कोव्हिशिल्ड नव्हे तर नोव्होव्हॅक्स लसींच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. म्हणजे एक प्रकारे अदर पूनावाला यांनी आपल्या वक्तव्यावरुन घूमजावच केला. खरं नोव्होव्हॅक्स या लसीला अद्याप भारतात वापरण्यासाठी परवानगी मिळालेली नाही.

…तर माझं मुंडकं कापलं जाईल ! अदर पूनावालांनी व्यक्त केली भीती

पूनावाला यांच्याकडून लसीच्या उत्पादनाबाबत सातत्याने वेगवेगळी विधानं करण्यात येत आहे. पण अद्यापही ते भारताला ज्या वेगाने लसींचे डोस हवे आहेत त्याची पूर्तता करू शकलेले नाही. अशावेळी आता वारंवार वेगवेगळी कारणं देणारे पूनावाला लसींचे उत्पादन कसे वाढवतात यावर देशातील लसीकरण मोहीम अवलंबून राहणार आहे.

    follow whatsapp