Pathaan Worldwide Box Office Collection Day 6
ADVERTISEMENT
पठाण : बॉलिवूड (Bollywood) किंग खानच्या ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाची जगभरात चर्चा सुरू आहे. शाहरुख खानचा (Shahrukh Khan) पठाण बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) जबरदस्त कमाई करत आहे. प्रदर्शनानंतर, पठाण रोज नवनवीन विक्रम रचत आहे. चित्रपटाची बंपर कमाई पाहून सर्वांनाच आश्चर्य होत आहे. पहिल्या वीकेंडमध्ये एखादा चित्रपट इतका जबरदस्त कलेक्शन करू शकतो, यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. या चित्रपटाने सलग सहाव्या दिवशी जगभरात 600 कोटींचा टप्पा गाठला आहे. दुसऱ्या आठवड्यात पठाणची कमाई थोडीशी कमी झाली आहे. परंतु जगभरात मात्र, पठाण आपला डंका वाजवत आहे.
Anil Parab Vs Kirit Somaiya : संघर्ष पेटला! म्हाडा कार्यालयाबाहेर ठिय्या
जगभर ‘Pathaan’ची चर्चा…
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाणला लोकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. पठाण पाहण्यासाठी शाहरुखचे चाहते चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी करत आहेत. जगभरात बॉक्स ऑफिसवर झळकणाऱ्या पठाणने सलग 6व्या दिवशीही त्याचा जलवा कायम ठेवला आहे. जगभरातील एकूण कलेक्शनने अवघ्या 6 दिवसांत 600 कोटींचा आकडा पार करणे हे पठाणसाठी मोठे यश आहे.
आवड्यातील सुरूवातीच्या दिवसात पठाणच्या कमाईत घट!
वीकेंडमध्ये 280 कोटींची कमाई केल्यानंतर, पठाणने आठवड्याच्या सुरूवातीला (सोमवारी) जवळजवळ 25 कोटींचा गल्ला जमवला आहे. यासह, आतापर्यंत भारतात पठाणचे एकूण कलेक्शन 303.75 कोटींवर पोहोचले आहे. वीकेंडमध्ये या चित्रपटाने भारतात 60.75 कोटींची कमाई केली. मात्र, सोमवारी चित्रपटाची कमाई निम्म्याहून कमी झाली आहे. याआधीचा चेन्नई एक्सप्रेस हा चित्रपट शाहरूखचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता.
Panvel Crime: घरापर्यंत सोडतो म्हणाला अन् केला गँगरेप, रात्री काय घडलं?
चित्रपटाच्या कलेक्शनचा वेग पाहता, शाहरुख लवकरच बॉलिवूडमध्ये 400 कोटींचा टप्पा गाठेल. असा अंदाज वर्तवला जात आहे. शाहरुख व्यतिरिक्त दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील या चित्रपटात दमदार अॅक्शन करताना दिसले आहेत. या चित्रपटात सलमान खानचीही छोटी भूमिका आहे, जी प्रेक्षकांना खूप आवडली आहे.
ADVERTISEMENT