मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएच्या अध्यक्षपदाची निवडणूक उद्या (गुरूवारी) पार पडणार आहे. अध्यक्षपदासाठी पवार-शेलार पॅनलचे अमोल काळे यांचं नाव चर्चेत आहे. याशिवाय शिवसेना (ठाकरे गट) सचिव मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
ADVERTISEMENT
दरम्यान, या मतदानाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय नेत्यांसाठी वानखेडे स्टेडियममधील गरवारे क्लब इथं स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कांँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बीसीसीआयचे खजिनदार आणि भाजप आमदार आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड असे सर्वजण एकाच मंचावर आले होते.
राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र त्यावर शरद पवार यांनी खेळात राजकारण आणतं नसल्याचं स्पष्ट करत चर्चांना पूर्णविराम दिला. पवार म्हणाले, या निवडणुकीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. त्यातही सगळे एकत्र आल्यानं चर्चा आहेत. पण मी सांगू इच्छितो की, आमच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. राजकारणाचे सगळ्यांचे वेगळे विषय आहेत. आम्ही तिथं संघर्ष करु पण क्रीडा प्रकारात राजकारण बाहेर ठेवतो.
मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो तेव्हा नरेंद्र मोदी हे गुजरात असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून मिटींगला यायचे. तसंच हिमाचलतर्फे अनुराग ठाकूर यायचे. काँग्रेसचे राजीव शुक्ला यायचे. सांगायचं कारण म्हणजे आम्ही खेळात राजकारण आणत नाही. आता भविष्यात काही प्रोजेक्ट हातात घ्यायचे आहेत. यापूर्वी बीसीसीआयचं हेड क्वार्टर आणलं. आपण बसलेलो हॉल उभा राहिला, असेही त्यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
आत्ताच शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांवर जी काही जबाबदारी टाकताना अशी टाकली आहे ती टाकताना असं बांधलं आहे की सासरच्या माणसाला कोण टाळू शकतं? शरद पवार यांची जी क्वालिटी आहे त्यामुळेच क्रिकेटला ते इथपर्यंत नेऊ शकले असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पवार-शेलार पॅनलने चांगलं काम केलं आहे
जे पॅनल या ठिकाणी तयार झालं आहे त्यामागे शरद पवार आणि आशिष शेलार आहेत. या दोघांनीही मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी चांगलं काम केलं आहे. ज्यांना व्हिजन आहे आणि ती प्रत्यक्षात उतरवण्याची क्षमता आहे असे हे दोन्ही नेते आहेत. त्यांच्या पॅनलमधले नेते हे कर्तृत्ववान आहेत. त्यांच्याकडे सर्वांपर्यंत पोहचण्याची कला आहे. या पॅनलला मुख्यमंत्र्यांची आणि माझी दोघांची साथ आहे.
ADVERTISEMENT