भाजपला ऐक्य नको आहे, ही बाब शरद पवार यांनी 25 वर्षांपूर्वी सांगितली होती. आम्हाला ते दोन वर्षांपूर्वी समजलं. देश किती मागे चालला आहे हे आम्हाला आता कळतं आहे असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकेचे बाण चालवले आहेत. नेमकेची बोलणे या शरद पवारांच्या भाषणावरील पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत करण्यात आलं त्यावेळी संजय राऊत यांनी आपल्या खुमासदार भाषणाने सगळ्यांची मनं जिंकली.
ADVERTISEMENT
काय म्हणाले संजय राऊत?
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नेमकेची बोलणे या पुस्तकाचं प्रकाशन करायला आपण इथे आलो आहोत. मला वाटतं नेमके बोलणे हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट दिलं पाहिजे. आम्ही सगळे मिळून त्यांना हे पुस्तक भेट देऊ. त्यानंतर मी त्यांना या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ काय ते पण सांगेन. शरद पवार यांनी कायमच देशाला आणि राज्याला दिशा देण्याचं काम केलं होतं. शरद पवारांचे जे विचार 25 वर्षांपूर्वी होते, ते आत्ताही कायम आहेत. आम्हाला ते दोन वर्षांपूर्वी समजले असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.
25 वर्षांपूर्वी जेव्हा युतीचं सरकार होतं तेव्हा म्हटलं होतं की हे पंतांचं सरकार आहे. मुंबईतल्या जमिनी व्यापाऱ्यांना विकू नका. मुंबईतील मराठी माणसाची पकड कमी होऊ नये असं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं असंही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मी शरद पवारांना खुर्ची दिली त्यावरून बरीच चर्चा झाली, टीका झाली, ट्रोलिंग झाला. मात्र मी त्यांना खुर्ची का दिली हे समजून घ्यायचं असेल तर या पुस्तकात असलेली त्यांची 61 भाषणं समजून घेतली पाहिजेत असंही संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.
शरद पवारांना मी खुर्ची दिली यामध्ये कुणाच्या पोटात दुखण्याचं कारण काय?-संजय राऊत
मला पुस्तक काही संपूर्ण वाचता आलं नाही. पण सहा-सात प्रकरणं वाचून दाखवली गेली. त्यामुळे थोडंसं वाचनही इथे झालं. बाळासाहेब ठाकरेंना शेवटी शेवटी आम्ही पुस्तकं, वर्तमानपत्रं वाचून दाखवत होतो. ते ऐकण्यातही एक वेगळी मजा असते. मी शरद पवारांना दिल्लीत खुर्ची बसायला दिली तेव्हा अनेकांनी माझ्यावर टीका केली. मी पवारसाहेबांना खुर्ची का दिली? हे समजून घ्यायचं असेल तर त्यांनी 61 भाषणं वाचली पाहिजेत असंही संजय राऊत म्हणाले. काही टीकाकार अत्यंत विकृत पद्धतीने टीका करत होते. त्यांनी हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना कळेल की माझ्यासराख्या एका सामान्य कार्यकर्त्याने त्यांना खुर्ची दिली आहे.
ADVERTISEMENT