अहमदाबाद: महाविकास आघाडी सरकारमधल्या कुरबुरींवर आज थेट शिवसेनेचे मुखपत्र सामनात भाष्य करण्यात आलंय. संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना अक्सिडेंटल होम मिनिस्टर ठरवलंय. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच आता एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर येते.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये एका बड्या उद्योगपतीची भेट घेतल्याचं कळतंय. पवार आणि पटेल यांची उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी भेट झाली. महत्त्वाचं म्हणजे पवार आणि पटेल यांचा हा दौर पूर्वनियोजित होता. केवडिया येथील साखर संमेलनात दोघंही सहभागी होणार होते.
‘अनिल देशमुखांना अपघातानं मिळालं गृहमंत्रीपद’, सामनातून शिवसेनेचा गौप्यस्फोट
पण हा पूर्वनियोजित कार्यक्रमच झाला नाही. पण पवार आणि पटेल यांची अदानी यांच्याशी भेट मात्र झाली. या भेटीनंतर दोघंही शनिवारी सकाळी ११ च्या सुमारा मुंबईला परतले.
या भेटीने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना वेग आलाय. या चर्चांमध्ये आता पवार आणि पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही भेटल्याचं कळतंय. त्यामुळे पवार आणि पटेल यांच्या अहमदाबाद दौऱ्याबद्दल आणखी वेगवेगळ्या शक्यतांचं पेव फूटलंय.
२०१९ मध्ये महाराष्ट्र सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरू झाल्या होत्या. मुंबई शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं सरकार येणार या दिशेने घडामोडी घडत होत्या. पण या घडामोडींमध्येच शरद पवार यांनी सत्तास्थापनेसाठी भाजपसोबतही बोलणी सुरू ठेवल्याचं समोर आलं होतं.
‘अपघाती गृहमंत्री झालात…’, राऊतांच्या टीकेवर दोनदा विचारला प्रश्न; पाहा गृहमंत्र्यांनी काय दिलं उत्तर!
या सर्व घडामोडींमध्ये एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी अहमदाबादमध्ये होते. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनी मात्र अशी कुठली भेटच झाली नसल्याचा दावा केलाय. या सगळ्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्यात.
ADVERTISEMENT