कोश्यारीच्या राजीनाम्यानंतर शरद पवार म्हणाले, ‘चौकशी व्हायला हवी’

मुंबई तक

12 Feb 2023 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:04 AM)

Sharad Pawar Reaction on bhagat Singh koshyari : गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त विधानं आणि भूमिकांमुळे विरोधी पक्ष आणि विविध संघटनांच्या रडारवर आलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पूर्ण केली. राज्यपाल पदावरून पदमुक्त करण्याची मागणी त्यांनी मोदींकडे केली होती. त्यानंतर त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी […]

Mumbaitak
follow google news

Sharad Pawar Reaction on bhagat Singh koshyari : गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त विधानं आणि भूमिकांमुळे विरोधी पक्ष आणि विविध संघटनांच्या रडारवर आलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पूर्ण केली. राज्यपाल पदावरून पदमुक्त करण्याची मागणी त्यांनी मोदींकडे केली होती. त्यानंतर त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं.

हे वाचलं का?

भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विराजमान झाल्यानंतर खऱ्या अर्थाने चर्चेत राहिले ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारसोबतचा त्यांचा संघर्ष सातत्यानं दिसून आला.

विधान परिषदेतील 12 जागांच्या नियुक्त्या असो की, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना आदेश देणे, अशा विविध कारणांमुळे महाविकास आघाडीकडून त्यांच्यावर समांतर सरकार चालवण्याचा आरोपही झाला. गेल्या काही महिन्यात त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांवरुन तीव्र पडसाद उमटले आणि कोश्यारींना अखेर पदमुक्त करण्यात आले.

Ramesh Bais: नगरसेवक ते महाराष्ट्राचे राज्यपाल, कोण आहेत रमेश बैस?

भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्यानंतर विरोधकांनी भाजपला चिमटे काढत निर्णयाचं स्वागत केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकाच वाक्यात या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

नागपूर येथे माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “आजच्या दिवसाची सुरुवात अतिशय चांगली झाली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने सुटका झाली आहे”, असं म्हणत पवारांनी कोश्यारींबद्दल भूमिका मांडली. शरद पवार असंही म्हणाले की, “राज्यपाल बदलण्याचा निर्णय हा अतिशय चांगला निर्णय आहे हा निर्णय फार अगोदरच घ्यायला हवा होता. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही अशी व्यक्ती राज्यपाल झाली नव्हती. राष्ट्रपतींनी राज्यपाल बदलला ही अतिशय समाधानकारक बाब आहे. जे जे संविधानाच्या विरोधात झालं असेल, त्या सगळ्यांची चौकशी व्हायला हवी”, अशी मागणी पवारांनी केली.

Bhagat Singh Koshyari : कोश्यारींचा राजीनामा मंजूर, बैस नवे राज्यपाल

कोश्यारींबद्दल बोलताना पवार म्हणाले होते, ‘…तर आम्हाला आनंदच होईल’

भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दल महिनाभरापूर्वी शरद पवार यांनी एक प्रतिक्रिया दिली होती. 18 जानेवारी 2023 रोजी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले होते की, “भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन दूर करण्यात येणार असल्याची चर्चा आम्ही ऐकली आहे. आमच्याकडेही ठोस माहिती नाही. पण एवढंच सांगतो, या सगळ्यात एकच गोष्ट चांगली होईल. आताचे जे राज्यपाल आहेत, त्यांच्यापासून महाराष्ट्राती सुटका झाली तर आम्हाला आनंदच होईल”, असं ते म्हणाले होते.

‘कोश्यारींनी हद्द पार केलीये’, पवारांनी स्पष्ट शब्दात मांडली होती नाराजी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सातत्यानं वादग्रस्त विधान झाल्यानंतर पवारांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. पवार म्हणाले होते की, “राज्यपालांनी हद्द ओलांडली आहे. या प्रकरणात पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हस्तक्षेप केला पाहिजे. मोठ्या पदावर आहात याचा अर्थ असा होत नाही की तिथे बसलेल्या लोकांना बेजबाबदार विधानं करण्याचा अधिकार मिळतो”, असं पवारांनी सुनावलं होतं.

    follow whatsapp