महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या मेळाव्यातून शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीयवादाचा आरोप केला. राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशात विकास होत असल्याचंही म्हटलं. राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांचा आज शरद पवार यांनी समाचार घेतला. बदललेल्या भूमिकेवरून पवारांनी राज ठाकरेंवर पलटवार केला.
ADVERTISEMENT
कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांना राज ठाकरेंच्या भाषणातील विविध मुद्द्यांबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावर पवारांनी भूमिका मांडली. “एक गोष्ट चांगली आहे की, बरीच वर्षे कुठे भूमिगत झाले होते; याचा अंदाज कुणालाच येत नव्हता. त्यामुळे ठाकरे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात येण्यास उत्सुक आहेत, हे कालच्या सभेतून दिसलं. त्यांचं हेच वैशिष्ट्ये आहे. दोन-चार महिने कुठेतरी भूमिगत होतात आणि एखाद व्याख्यान घेऊन पुन्हा पुढचे तीन-चार महिने ते काय करतात मला माहिती नाही,” असा टोला पवारांनी ठाकरेंना लगावला.
‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जाती-जातीत द्वेष, शरद पवारांना पण तेच हवंय’, राज ठाकरेंची जहरी टीका
“जातीवादासंदर्भात त्यांनी प्रश्न त्यांनी केला. ते काहीही म्हणू शकतात. पण दोन तीन गोष्टी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गेल्या पाच-सात वर्षाचा उल्लेख त्यांनी केला. राष्ट्रवादीचं नेतृत्व राज्यात कोण कोण करत होतं. विधानसभा असो वा विधान परिषद. पहिल्यांदा छगन भुजबळ नेते होते. नंतर मधुकरराव पिचड जे आदिवासी नेते आहेत. पहिल्यांदा अजित पवारांची निवड झाली. कारण सदस्यांनी सांगितलं की, त्यांना विधिमंडळात येऊन ३० वर्ष झाली. ३० वर्ष काम केल्यानंतर त्यांना संधी दिली जावी. त्यातून त्यांची निवड झाली. इतर जाती जमातीच्या लोकांना पुढे घेऊन जाण्याचा दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे आणि राहिन”, असा पलटवार पवारांनी राज ठाकरेंवर केला.
“उत्तर प्रदेशचं कौतुक त्यांनी केलं. त्यामुळेच मी म्हणालो की, ते काहीही बोलू शकतात. उत्तर प्रदेशात त्यांना कौतुकास्पद काय दिसलं मला माहिती नाही. उत्तर प्रदेशात अलिकडेच्या काळात काय काय घडलं. निवडणुकीचा निकाल वेगळा लागला. त्याची कारण दुसरी आहेत. पण त्याठिकाणी लखीमपूरला शेतकऱ्यांची हत्या झाली. उत्तर प्रदेशच्या सीमेवर जवळपास १ वर्ष शेतकरी बसले होते. त्या सगळ्याची सोडवून करायला कुणी पुढे आलं नाही. कितीतरी गोष्ट अशा सांगता येतील की त्या योगींच्या राजवटीच्या काळात उत्तर प्रदेशात घडल्या आहेत. अशा पद्धतीची राजवट उत्तम आहे, असं जर ठाकरे म्हणत असतील, तर मला त्यावर काही भाष्य करायचं नाही. महाराष्ट्रात असं काही उद्धव ठाकरेंचं सरकार होऊ देणार नाही,” असं शरद पवार म्हणाले.
Raj Thackeray Speech: राज ठाकरे यांचं पाडवा मेळाव्यातील भाषण जसंच्या तसं
“मोदींच्या संबंधी काय काय भूमिका मांडत होते, हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. आता त्यांच्या काही तरी बदललं झालेलं दिसतोय. अयोध्यात जाताहेत. आणखी काय काय करताहेत. त्यांच्या बदल झालेला दिसतोय. त्यामुळे मोदींच्या भूमिकेबद्दलची त्यांची आजची भूमिका अनुकूल आहे. उद्याची मी सांगू शकत नाही. त्यांच्या भूमिकेत सातत्य नसतं, हे अनेकदा आपण पाहिलं आहे.”
“मुंबई महापालिका आणि अन्य निवडणुकीत राज ठाकरेंचा पक्ष हा किती सहभागी होईल, हे मी सांगू शकत नाही. त्यांचे मागच्या निवडणुकीतील आकडे सगळ्यांना माहिती आहे. त्यांचे मर्यादित आकडे आहेत. त्यांचा आकडा बघायचा असेल, तर नोटाचा पुढे जात नाही. यानंतर पुढे काय कर्तृत्व दाखवतील हे मी सांगू शकत नाही,” असं सांगत पवारांनी राज ठाकरेंना डिवचलं.
ADVERTISEMENT