तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या अपघातात MI-17V5 हे हेलॉकॉप्टर पूर्णपणे जळून राख झाले, ज्यामध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत यांच्यासह 14 जण होते. इतकच नाही तर त्यामधून प्रवास करणाऱ्या 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाला, ज्याच्यात बिपीन रावतसह त्यांच्या पत्नीचाही समावेश आहे.
ADVERTISEMENT
धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने हा अपघात झाला असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. असाच एक प्रसंग राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत घडला होता. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा प्रसंग सांगितला आहे.
शरद पवार काय म्हणाले?
देशातील लष्कर प्रमुख ज्या वाहनातून प्रवास करतात, ती वाहने अतिशय उत्तम दर्जाची असतात. त्या वाहनांवर कुठल्याही प्रकारचे संकट येणार नाही, अशाप्रकारचा विचार करून ही वाहने बनवलेली असतात. ज्या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत यांचा अपघात झाला, ते वाहनही सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय योग्य होतं, तरीही त्या हेलिकॉप्टरचा अपघात होणे, हे अतिशय दुर्दैवी होतं. हेलिकॉप्टर किंवा विमान कितीही सुरक्षित असलं तरी इतरही काही गोष्टींमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याचं शरद पवारांनी सांगितलं.
शरद पवारांनी सांगितला प्रसंग
एक दिवशी पुण्याहून मुंबईला शरद पवार हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. यावेळी त्यांच्यासोबत एक राज्यमंत्री आणि शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार होत्या. लोणावळ्याच्या पुढे आल्यानंतर एका व्हॅलीमध्ये शरद पवारांचे हेलिकॉप्टर आले. तिथे आल्यानंतर हेलिकॉप्टरच्या पायलटसमोर एक वेगळी समस्या समोर आली. ती म्हणजे पवारांचे हेलिकॉप्टर संपूर्णरित्या ढगांमध्ये अडकलं. एवढच नाही तर समोरून जोराच्या वाऱ्याचा सामनादेखील हेलिकॉप्टरला करावा लागला होता.
या प्रसंगामुळे हेलिकॉप्टर पुढे जायला मर्यादा येऊ लागल्या. व्हॅली असल्यामुळे उंचीचं संकटही पायलटसमोर होतं. याचदरम्यान शरद पवारांनी आपल्या अनुभवानुसार पायलटला काही सुचना दिल्या. शरद पवारांनी आपले हेलिकॉप्टर समूद्र सपाटीपासून 7 हजार फुटांपर्यंत वरती नेण्याचे आदेश दिले. यामागे फक्त एकच कारण होतं, महाराष्ट्रात सगळ्यात उंच ठिकाणी कळसुबाई शिखर आहे, ज्याची उंची 5427 फूट आहे, म्हणून पवारांनीही आपलं हेलिकॉप्टर 7 हजार फूट उंच नेण्यासाठी सांगितले. त्यामुळे ढगाळ वातावरण आणि वारा जरी असला तरी मात्र कुठेही न डगमगता आणि कुठल्या डोंगराळ भागाला न धडकता शरद पवारांचं हेलिकॉप्टर मुंबईला येऊन पोहोचलं.
ADVERTISEMENT