पाठीत खंजीर खुपसण्याच्या ‘त्या’ आरोपाबाबत शरद पवार म्हणतात…

मुंबई तक

• 01:32 PM • 11 Sep 2021

1978 मध्ये वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतःच सरकार शरद पवार यांनी स्थापन केल्याचा आरोप नेहमी केला जातो. हाच संदर्भ देऊन शरद पवार हे भाजपसोबत जाऊ शकतात अस प्रमोद महाजन स्वतः पत्रकार परिषदेत सांगत असत. याबाबत इतक्या वर्षांनी शरद पवारांनी मांडलेली भूमिका महत्त्वाची आहे. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी ही भूमिका सविस्तर […]

Mumbaitak
follow google news

1978 मध्ये वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतःच सरकार शरद पवार यांनी स्थापन केल्याचा आरोप नेहमी केला जातो. हाच संदर्भ देऊन शरद पवार हे भाजपसोबत जाऊ शकतात अस प्रमोद महाजन स्वतः पत्रकार परिषदेत सांगत असत. याबाबत इतक्या वर्षांनी शरद पवारांनी मांडलेली भूमिका महत्त्वाची आहे. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी ही भूमिका सविस्तर मांडली आहे. इंडिया टुडेचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई आणि सिनीयर एक्झिक्युटिव्ह एडिटर साहिल जोशी यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं.

हे वाचलं का?

सीताराम केसरी यांनी देवेगौडा सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यावर एनकेपी साळवे यांच्यामार्फत शरद पवारांकडे एक प्रस्ताव देण्यात आला होता. केसरींच्या निर्णयाने नाराज खासदारांनी पवारांच्या नेतृत्वात एक गट बनवावा, असा हा प्रस्ताव होता. पण जुनी प्रतिमा (पाठीत खंजीर खुपसण्याची) पुन्हा आपल्याशी जोडली जाऊ नये म्हणून पवारांनी हा प्रस्ताव फेटाळल्याचा उल्लेख इंद्रकुमार गुजराल यांच्या पुस्तकात आहे. याबद्दलच साहिल जोशी यांनी पवारांना प्रश्न विचारला. यावर पवार म्हणतात,

‘माझ्यावर नेहमी तो आरोप व्हायचा. नंतर तुम्ही म्हणता तसं देवेगौडांच्या वेळेलाही. शेवटी साळवेंच्या किंवा कुणाच्या तरी किंवा माझ्या घरी जवळपास 60-65 काँग्रेस सभासद जमले आणि अक्षरशः त्यांनी तुम्ही नेतृत्व करा, म्हणत माझ्यावर दबाव टाकला. बाकी सगळे पाठिंबा द्यायला तयार आहेत, असं सांगितलं.

देवेगौडा आणि इतरही लोकांनी तुम्ही सरकार बनवा. आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, असं मला सांगितलं. पण मी म्हणालो, एकदा या संबंधीचा ठपका माझ्या राजकीय जीवनावर कायम बसलाय. मला त्या रस्तानं पुन्हा जायचं नाही असं म्हणत शरद पवारांनी या प्रश्नाला उत्तर दिलं.

महाविकास आघाडीबाबत काय म्हणाले शरद पवार?

महाराष्ट्रातली 2019 ची विधानसभा निवडणूक झाल्या झाल्या लगेच सरकार झालं नाही. मधल्या दोन-महिन्यात शिवसेना आणि भाजपचं सरकार बनत नाही हे दिसू लागल्यानंतर आम्ही सत्ता आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या. आमच्या चर्चा होत असताना आपण तिघे एकत्र येऊन सरकार बनवू शकू असा अंदाज यायला लागला. काँग्रेसमधल्या सहकाऱ्यांशी मी चर्चा करत होतो. त्यांना मी काय सांगतो आहे ते पटत होतं. हे सरकार व्हावं असं काँग्रेसच्याही सहकाऱ्यांना वाटत होतं. कारण त्यांना भाजप नको होतं.’

‘आता प्रश्न असा आला की सोनिया गांधी यांना कुणी कनव्हिन्स करायचं? श्रीमती सोनिया गांधी शिवसेनेसोबत जायला तयार होतील असं अनेकांना वाटत नव्हतं. काँग्रेसमधल्या काही सहकाऱ्यांनी यामध्ये पुढाकार घेतला. त्यांच्या वतीने मी थेट त्यांची भेट घेतली आणि सविस्तर सुसंवाद केला. भाजपला महाराष्ट्रात बाजूला ठेवायचं असेल तर आपण (शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी) एकत्र आलं पाहिजे हे मी त्यांना सांगितलं. त्यानंतर हा प्रयोग महाराष्ट्रात झाला असं शरद पवार यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

    follow whatsapp