‘उद्धव ठाकरे, शरद पवारांना दोनवेळा फोन’, बावनकुळे म्हणाले, ‘नियत दिसून आली’

मुंबई तक

06 Dec 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:35 AM)

जी20 (G20) परिषद भारतात होणार असून, परिषदेच्या अनुषंगाने सर्वपक्षीय नेत्यांची बैठक राष्ट्रपती भवनात बोलावण्यात आली होती. या बैठकीला उद्धव ठाकरे आणि शरद पवार अनुपस्थित होते. दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्यानं भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंसह पवारांवर निशाणा साधला आहे. जी20 परिषदेसंदर्भात सूचना, चर्चा आणि धोरण ठरवण्यासंदर्भात सोमवारी (5 डिसेंबर) दिल्लीत बैठकीचं आयोजन […]

Mumbaitak
follow google news

जी20 (G20) परिषद भारतात होणार असून, परिषदेच्या अनुषंगाने सर्वपक्षीय नेत्यांची बैठक राष्ट्रपती भवनात बोलावण्यात आली होती. या बैठकीला उद्धव ठाकरे आणि शरद पवार अनुपस्थित होते. दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्यानं भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंसह पवारांवर निशाणा साधला आहे.

हे वाचलं का?

जी20 परिषदेसंदर्भात सूचना, चर्चा आणि धोरण ठरवण्यासंदर्भात सोमवारी (5 डिसेंबर) दिल्लीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जवळपास सर्वच पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.

या बैठकीला ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांच्यापासून अनेक विरोधी पक्षाचे नेते उपस्थित राहिले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अनुपस्थित होते. त्यामुळे ठाकरेंनी मोदींना भेटण्याचं टाळलं अशीही चर्चा केली गेली.

Uddhav Thackeray : महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांविरोधात १७ डिसेंबरला विराट मोर्चा

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या अनुपस्थितीवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केलीये.

बावनकुळेंनी म्हटलंय की, “उद्धव ठाकरे जे कधीही बाहेर पडत नव्हते, ते प्रकाश आंबेडकरांना भेटायला जातात, तो प्रस्ताव घेऊन अजित पवारांच्या घरी जातात. राजेशाहीतून लोकशाहीच्या मूल्यांकडे होत असलेल्या या प्रवासाबद्दल त्यांचे अभिनंदन. लोकशाही मूल्ये जपणार्‍या प्रत्येक घडामोडींचे भाजपाने कायमच स्वागत केले आहे”, असा खोचक टोला बावनकुळे यांनी ठाकरेंना लगावला.

चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

पुढे बावनकुळे म्हणतात, “G20 सारख्या महत्त्वाच्या बैठकीसाठी शरद पवारजी आणि उद्धवजी यांना रितसर 15 नोव्हेंबर 2022 रोजी निमंत्रण पाठवून, दोनवेळा फोनवर अगत्याने निमंत्रण देऊन सुद्धा त्या बैठकीला न जाता, आजचाच दिवस आपण बैठकीसाठी निवडला. यातून राष्ट्रवैभवाप्रती सुद्धा आपली नियत दिसून आली”, अशा शब्दात बावनकुळेंनी ठाकरे आणि पवारांना लक्ष्य केलंय.

RSS, नरसिंह अवतार ते नेभळटपणा; आशिष शेलारांनी सगळंच काढलं, ठाकरे-राऊतांवर चढवला हल्ला

“असो, राष्ट्र प्रथम आणि लोकशाही मूल्य यावर आपल्या आणि सवंगड्यांबाबत न बोललेलेच बरे. तरीसुद्धा मातोश्रीचा उंबरठा ओलांडून आपण बाहेर आलात. अभिनंदन! पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात नियतीला सुद्धा राजेशाहीचा लोकशाहीकडचाच प्रवास अभिप्रेत आहे”, असा चिमटा बावनकुळे यांनी ठाकरेंना काढला आहे.

    follow whatsapp