शरद पवारांची पत्रकार परिषद आणि त्यांचे 11 मास्टरस्ट्रोक

मुंबई तक

• 01:41 PM • 06 Apr 2022

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज (6 एप्रिल) बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधानांशी नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा केली याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. शरद पवार यांच्या याच पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे: पाहा शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील 11 महत्त्वाचे मुद्दे: 1. संजय राऊतांच्या […]

Mumbaitak
follow google news

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज (6 एप्रिल) बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधानांशी नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा केली याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. शरद पवार यांच्या याच पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

हे वाचलं का?

पाहा शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील 11 महत्त्वाचे मुद्दे:

1. संजय राऊतांच्या कारवाईची बाब मोदींची निर्दशनास आणून दिली.

2. संजय राऊतांवर अन्याय झाला याची कल्पना मोदींना दिली, राऊतांची मालमत्ता जप्त करणं अयोग्य

3. संजय राऊतांवर कारवाई करण्याची काय गरज होती?

4. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे प्रलंबित असलेल्या 12 आमदारांच्या नियुक्तीवर चर्चा केली.

5. वरील दोन्ही विषयावर पंतप्रधान मोदी हे नक्कीच विचार करतील.

6. भाजपसोबत आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपविरोधात आहे.

7. महाविकास आघाडी 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि आम्ही पुन्हा सत्तेत येऊ

8. महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही

9. राज्यात असणाऱ्या मंत्रिमंडळात सध्या कोणताही बदल होणार नाही.

10. राज ठाकरेंच्या वक्तव्याकडे मी फार लक्ष देत नाही.

11. राज ठाकरे हे आधी भाजपविरोधी होते आणि आता ते बदलले आहेत.

पाहा संजय राऊतांच्या ईडी कारवाईबाबत शरद पवार पंतप्रधान मोदींशी काय बोलले:

संजय राऊत यांच्यावर कारवाईची नेमकी गरज काय होती? असा सवाल करत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींकडे ईडीने संजय राऊत यांच्यावर जी संपत्ती जप्तीची कारवाई केली आहे त्याचविषयी तक्रार केली आहे. ‘संजय राऊत यांच्यावर झालेली ईडी कारवाईबाबत मी मोदींना माहिती दिली आहे. राऊत हे राज्यसभा सदस्य आहेत आणि ते सामनाच्या पत्रकार आहेत. याबाबत मी मोदींना कल्पना दिली आहे. या विषयांवर मोदी नक्की विचार करतील आणि ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. असं पवार यावेळी म्हणाले.

‘संजय राऊतांविरोधात कारवाईची गरजच काय?’ शरद पवारांनी केली PM मोदींकडे तक्रार

याचबाबत पत्रकारांनी पवारांना असंही विचारलं की, आपल्याला राऊतांच्या मुद्द्यावर मोदींनी काय उत्तर दिलं? त्यावर पवार म्हणाले की, ‘आम्हाला उत्तराची अपेक्षा नाही. संजय राऊत हे राज्यसभेचे सदस्य आहेत. ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली आहे तीच गोष्ट मी मोदींच्या कानावर घातली आहे.’

    follow whatsapp