Sharad Pawar attack on Devendra Fadnavis: मुंबई: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवारांच्या (Ajit Pawar) पहाटेच्या शपथविधीला तीन वर्ष झाली तरीही त्यातील गुपित हे आजही कायम आहे. ज्यावरुन नेहमीच वेगवेगळ्या चर्चा या सुरू असतात. आज (13 फेब्रुवारी) पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवरुन खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ज्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीचं प्रकरण पुन्हा एकदा तापलं आहे. (sharad pawars reply to devendra fadnavis even though he is a decent person i never thought that he would speak based on lies)
ADVERTISEMENT
‘2019 मध्ये अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करताना शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली होती. ती काही खाली चर्चा झाली नव्हती. शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या. पण त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे.’ असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केल्यानंतर आता शरद पवारांनी देखील याला तात्काळ प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी पाहून मला धक्काच बसला होता-शरद पवार
‘देवेंद्र फडणवीस सभ्य माणूस, तरीही…’
‘देवेंद्र फडणवीस हा सुसंस्कृत माणूस आहे, सभ्य माणूस आहे तरीही असत्याचा आधार घेत असं बोलतील मला कधी वाटलं नाही. कशाच्या आधारावर ते बोलले मला माहीत नाही.’ असं म्हणतत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांनी केलेला दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. यामुळे आता या विषयावरुन पुन्हा एकदा फडणवीस आणि पवारांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत शरद पवारांनी अनेकदा सांगितलं आहे की, अजित पवारांनी रागाच्या भरात भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं होतं. ती त्यांची चूक होती. त्याला आमचा कधीही पाठिंबा नव्हता. त्यांना त्यांची चूक कळली तेव्हा ते माघारी आले. त्यामुळे त्या शपथविधीशी आपला काहीही संबंध नव्हता.
मात्र, नेमकी हीच गोष्ट खोटं असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस करत आहेत. अजितदादांसोबतचं सरकार हे शरद पवारांच्या संमतीनेच स्थापन झालं होतं असा दावा देवेंद्र फडणवीस वारंवार करत आहेत.
जयंत पाटलांनीही केलेलं खळबळजनक वक्तव्य…
‘शरद पवारांच्या खेळीचा अर्थ अनेकदा.. खूप उशिरा लागतो. 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागली होती. ती उठवण्याशिवाय काही पर्याय नव्हता, त्याअनुशंगाने शरद पवारांची ती खेळी असू शकते.’ असं जयंत पाटील म्हणाले होते. ज्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
देवेंद्र फडणवीस बदला घेताहेत का? संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले…
पाहा पहाटेच्या शपथविधीबाबत मुंबई Tak ला दिलेल्या मुलाखतीत काय म्हणालेले शरद पवार:
‘शिवसेना आणि भाजप यांच्यात अंतर आहे हे आम्हाला दिसत होतं. एकीकडे शिवसेनेशी आणि काँग्रेसशी एकत्र येण्याबाबत बोलणी सुरू होती. त्यावेळीच एक निरोप आला होता की भाजपही सोबत येण्यास तयार आहे. जवळपास दीड महिना झाल्यानंतरही सरकार बनत नाही हे पाहून अनेक आमदार निराश झाले होते. आम्हाला काही जण सांगत होते काही करून सरकार स्थापन करा. भाजपही तयार आहे त्याचा विचार करा असं काही जणांनी सुचवलं.’
‘मात्र भाजपला दूर ठेवायचं असल्याने आम्ही हा विचार मानला नाही. अजित पवार त्यावेळी एक बैठक झाली त्यामध्ये वैतागले होते. तुम्ही म्हणता तसं असं अजित पवार म्हणाले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला. पहाटे जो शपथविधी झाला त्याबद्दल आम्हाला कुणालाच काहीही माहित नव्हतं. मी सुद्धा झोपेतच होतो, मला उठवलं आणि सांगितलं गेलं जे ऐकून मला धक्काच बसला.’ असं शरद पवार यांनी मुंबई Tak ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.
ADVERTISEMENT