मुंबई: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांमध्ये सध्या जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अस्तित्वात आल्यापासून महाराष्ट्रात (Maharashtra) जातीपातीचं राजकारण (Politics) वाढल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. तेव्हापासून राज ठाकरेंवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने टीका होत आहे. असं असताना आता राज ठाकरेंनी थेट आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन राष्ट्रवादीवर ट्विट हल्ला चढवला आहे. पण यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रबोधनकारांचा बौद्धिक डोस दिला आहे.
ADVERTISEMENT
राज ठाकरेंनी केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेससह संभाजी ब्रिगेडचे नेते देखील आक्रमक झाले आहेत. तर दुसरी स्वत: शरद पवार यांनी राज ठाकरेंना प्रबोधनकारांचं लिखाण वाचावं असा सल्ला दिल्ला होता. ज्यानंतर आता राज ठाकरेंनी प्रबोधनकारांच्याच पुस्तकातील एक वाक्य ट्विट करुन शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
राज ठाकरेंकडून राष्ट्रवादी काँग्रेसला ‘बौद्धिक’ डोस, पाहा नेमकं काय म्हटलं..
राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करताना असं म्हटलं आहे की, “जिथे चिकित्सा-स्वातंत्र्य नाही, तिथे बौध्दिक विकास नाही… जिथे बौध्दिक विकासाला बंदी, तिथे राज्यकर्त्यांनी समाज-विकासावर मोठमोठी व्याख्याने देणे, म्हणजे बांडगुळानेच झाडाचं रक्त शोषणं होय!”
: प्रबोधनकार ठाकरे
‘माझी जीवनगाथा’ (पाने २८०-२८१)
असं ट्विट करुन राज ठाकरे यांनी एक प्रकारे शरद पवार यांच्याविरोधात ट्विट हल्लाच केला आहेत.
जेव्हापासून राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे तेव्हापासून दोन्ही पक्षातील अनेक नेते हे एकमेकांविरोधात टीकास्त्र सोडत आहेत. असं असताना आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा अशा प्रकारचं ट्विट करुन या मुद्द्याला आणखी हवा दिली आहे.
नेमका वाद कशावरुन सुरु झाला?
राज ठाकरे यांनी पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांना असा सवाल विचारण्यात आला होता की, हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का? ज्यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव घेत असं म्हटलं होतं की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात आल्यापासून जाती-जातीचं राजकारण महाराष्ट्रात सुरु झालेलं आहे.’
‘मागील 20 वर्षापासून महाराष्ट्रातील चित्र हे बदललं आहे. लोक आपल्या जातीचा अभिमान बाळगण्यासोबतच दुसऱ्या जातीचा मात्र तिरस्कार करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून महाराष्ट्रात जातीचा मुद्दा हा मोठा झालेला दिसून येत आहे.’ असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला होता.
Raj Thackeray : दुसऱ्या जातीचा द्वेष वाढत जाणं हे महाराष्ट्राच्या प्रतिमेला डाग लावणारं-राज ठाकरे
दरम्यान, राज ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर शरद पवार यांना जेव्हा याबाबतची प्रतिक्रिया विचारण्यात आली होती तेव्हा त्यांनी याबाबत फार प्रतिक्रिया न देता फक्त एवढंच म्हटलं की, ‘राज ठाकरे यांच्यावर नो बोललेलं बरं. त्यांनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावं.’ असा टोला शरद पवारांनी लगावला होता.
ADVERTISEMENT