अभिनेता राहुल वोहरा याचं कोरोनामुळे निधन झालं आहे. राहुल दिल्लीतील एका रूग्णालयात कोरोनाचे उपचार घेत होता. मात्र उपचारांदरम्यान त्याचं निधन झालं. मृत्यूपूर्वी राहुलने लिहिलेली फेसबुक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल झाली आहे. जर माझ्यावर चांगले उपचार झाले असते तर मी वाचू शकलो असतो, अशा आशयाची पोस्ट मृत्यूपूर्वी राहुलने लिहिली होती.
ADVERTISEMENT
राहुलच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी ज्योती राहुलसाठी न्याय मागतेय. ज्योतीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली आहे. यासोबतच तिने राहुलचा व्हिडीयो शेअर केला आहे. या व्हिडीयोमध्ये राहुल रूग्णालयातील बेजबाबदारपणाबदद्ल सांगतोय. हा व्हिडिओ शेअर करताना ज्योती तिवारीने आपल्या पोस्टमध्ये राहुल वोहराच्या मृत्यूसाठी रुग्णालयाला जबाबदार धरलंय.
ज्योतीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, “माझा राहुल गेला, सर्वांना हे माहित आहे. परंतु तो कसा गेला हे कोणालाही माहिती नाही. राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ताहिरपूर दिल्ली. तिथे अशी वागणूक दिली जाते. मला आशा आहे की माझ्या पतीला न्याय मिळेल. अजून एक राहुल हे जग सोडू नये.”
सध्या ज्योतीचा सोशल मीडियावरील पोस्ट आणि राहुल वोहराचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. ज्योतिच्या या पोस्टनंतर राहुलला न्याय मिळणार का हा प्रश्न उपस्थित होतोय.
ADVERTISEMENT