shashikant ghorpade : सहसंचालक शशिकांत घोरपडेंचा नीरा नदीत मृतदेह सापडल्यानं खळबळ

मुंबई तक

14 Oct 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:09 AM)

-इम्तियाज मुजावर, सातारा दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांच्याबद्दलची मोठी माहिती समोर आलीये. शशिकांत घोरपडे यांचा शोध घेतला जात होता. शुक्रवारी त्यांचा मृतदेह नीरा नदी पात्रात आढळला आहे. पणन विभागात कार्यरत सहसंचालक शशिकांत घोरपडे बुधवारी (१२ ऑक्टोबर) बेपत्ता झाले होते. घोरपडे दुपारी ३ वाजेच्या सुमारास पुणे येथील कार्यालयातून मोबाईल बंद करून […]

Mumbaitak
follow google news

-इम्तियाज मुजावर, सातारा

हे वाचलं का?

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांच्याबद्दलची मोठी माहिती समोर आलीये. शशिकांत घोरपडे यांचा शोध घेतला जात होता. शुक्रवारी त्यांचा मृतदेह नीरा नदी पात्रात आढळला आहे.

पणन विभागात कार्यरत सहसंचालक शशिकांत घोरपडे बुधवारी (१२ ऑक्टोबर) बेपत्ता झाले होते. घोरपडे दुपारी ३ वाजेच्या सुमारास पुणे येथील कार्यालयातून मोबाईल बंद करून बाहेर पडले. त्यानंतर त्यांचा ठिकाणा कळू शकला नाही. त्यांच्या कुटुंबियांनी घोरपडे बेपत्ता झाल्याची तक्रार शिरवळ पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला होता.

शशिकांत घोरपडे यांच्या कुटुंबियांनी तक्रार दिल्यानंतर गुरुवारपासून पोलिसांनी तपास सुरू केला. तपास करत असताना पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज आले. सातारा-पुणे महामार्गावर असलेल्या शिंदेवाडी या महामार्गालगत असलेल्या हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये शशिकांत घोरपडे शेवटचे कैद झाले.

पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये शशिकांत घोरपडे हे नीरा नदीवरील पुलाकडे जाताना दिसत आहे. तसेच त्यांची गाडी पुलाजवळ आढळून आली. त्यानंतर शशिकांत शिंदेंनी आत्महत्या केली असावी, या अंदाजाने पोलिसांनी नदीपात्रात शोध सुरू केला.

शशिकांत शिंदे यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एनडीआरएफच्या जवानांची मदत घेतली. शुक्रवारी सातारा-पुणे हद्दीवर नीरा नदीच्या पात्रात घोरपडे यांचा मृतदेह रेस्क्यू टीमला आढळून आला. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घोरपडे यांच्या शोधकार्यात पोलीस आणि एनडीआरएफच्या जवानांच्या प्रयत्नांना यश आलं.

महासंचालक शशिकांत घोरपडे बेपत्ता; नीरा नदीत आत्महत्या केल्याचा संशय, शोध सुरू

आत्महत्या की हत्या? शशिकांत घोरपडेंच्या मृत्यूचं गुढ

शशिकांत घोरपडे कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाले. त्यानंतर थेट त्यांचा मृतदेहच सापडला. शशिकांत घोरपडे यांची कार नीरा नदीपात्रावरील पुलाजवळ आढळली. तर त्यांचा मृतदेह नदीपात्रात सापडला. त्यामुळे शशिकांत घोरपडे यांनी आत्महत्या केली की त्यांच्यासोबत घातपात झाला? हा प्रश्न उपस्थित झालाय. महत्त्वाचं म्हणजे घोरपडे यांनी आत्महत्या केली असेल, तर त्यामागं काय कारण असावं, याबद्दलही चर्चा सुरु झालीये. सध्या पोलीस घोरपडे यांच्या मृत्यूचं कारण शोधण्याच्या दिशेनं तपास करत आहेत.

    follow whatsapp