सोनाक्षी, लव-कुश ड्रग्ज घेत नाहीत, त्यांच्यावर चांगले संस्कार-शत्रुघ्न सिन्हा

मुंबई तक

• 04:20 PM • 02 Nov 2021

सोनाक्षी, लव आणि कुश हे कधीही ड्रग्ज घेत नाहीत. त्यांच्यावर मी चांगले संस्कार घडवले आहेत. त्यांना अशा कोणत्याही चुकीच्या सवयी नाहीत असं या तिघांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. त्याबाबत बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आणखी काय म्हणाले […]

Mumbaitak
follow google news

सोनाक्षी, लव आणि कुश हे कधीही ड्रग्ज घेत नाहीत. त्यांच्यावर मी चांगले संस्कार घडवले आहेत. त्यांना अशा कोणत्याही चुकीच्या सवयी नाहीत असं या तिघांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. त्याबाबत बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचलं का?

आणखी काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा?

25 दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात घालवल्यानंतर आर्यन खानला जामीन मिळाला. 28 ऑक्टोबरला आर्यन खानला जामीन मंजूर झाला, 30 तारखेला तो तुरुंगाच्या बाहेर आला. या संदर्भात NDTV शी संवाद साधत असताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, ‘एखाद्या सुपरस्टारला त्याच्या मुलाला घडवणं कठीण असतं. एवढंच नाही तर आर्यन खानला ज्या प्रकारे एनसीबीने अटक केली त्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थिते केला आहे. आपल्या मुलांना चांगल्या मार्गाला लावणं हे कोणत्याही सेलिब्रिटीपुढे एक आव्हानच असतं हे पण तितकंच खरं आहे. कारण कोणत्याही स्टारचं आयुष्य हे खूप बिझी आहे. मी देखील कायम तंबाखू सेवनाच्या विरोधात जनजागृती केली आहे’ असंही या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं.

आणखी काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा

आज मी स्वतःला भाग्यवान समजोत की माझी मुलं लव-कुश आणि मुलगी सोनाक्षी यांच्याबाबत मी अभिमानाने सांगू इच्छितो की त्यांच्यावर चांगले संस्कार झाले आहेत. त्यामुळे त्यांना ड्रग्ज किंवा कोणतंही व्यसन लागलेलं नाही. मी कधी त्यांना कधी असं पाहिलं नाही, कोणत्या प्रकरणात अडकलेत हे ऐकलं नाही आणि अशा प्रकारचं व्यसन त्यांनी कधी केलंही नाही.

आपल्या मुलांना व्यसनाधिनतेपासून, वाईट सवयींपासून दूर ठेवण्याचं जबाबदारी प्रत्येक आई वडिलांची असते. तुमच्या मुलांना एकटं वाटलं नाही पाहिजे. तसंच त्यांना कुणाची संगत लाभते आहे यावरही आई वडिलांचं काटेकोर लक्ष असलं पाहिजे असंही या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी सुचवलं.

आर्यन खानला 2 ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला 28 ऑक्टोबरला बॉम्बे हायकोर्टाने जामीन मंजूर केला. त्यानंतर 30 ऑक्टोबरला तो तुरुंगाच्या बाहेर आला. 1 लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आर्यन खानला जामीन मंजूर झाला. त्याला आता दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात जाऊन हजेरी लावावी लागणार आहे. तसंच कोर्टाच्या संमती शिवाय त्याला शहरही सोडता येणार नाही.

    follow whatsapp