रिदा रशीद यांनी जितेंद्र आव्हाडांवर विनयभंग केल्याचा आरोप केलाय. मुंब्रा पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिंदे गटातल्या नेत्या शितल म्हात्रे यांनी राजीनामा देण्याच्या इशाऱ्यावरून पलटवार केलाय.
ADVERTISEMENT
भाजप महिला मोर्चा आघाडीच्या उपाध्यक्षा रिदा रशीद यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप केलाय. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांवर दुसरा गुन्हा दाखल झालाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतलीये. त्यावरून शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी दबाव टाकून नका म्हणत टीका केलीये.
शितल म्हात्रे म्हणाल्या, “आज आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज सकाळपासून मी आमदारकीचा राजीनामा देईन, अशा पद्धतीची बातमी चालतेय. मी एव्हढंच सांगेन की, जर एखाद्या महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन सांगितलं की, माझ्यावर विनयभंग झालाय असं मला वाटतं, तर तिची केस नोंदवून घेणं पोलिसांचं काम आहे.”
जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, ठाण्यात जाळपोळ; किरीट सोमय्यांनी काढलं जुनं प्रकरण
विनयभंगाच्या प्रकरणाबद्दल पुढे शितल म्हात्रे म्हणतात, “त्या पद्धतीने ही केल नोंदवण्यात आलीये. जर तुम्हाला ही केस खोटी वाटत असेल, तर कोर्टात जाऊन सिद्ध करावं. हे कायद्याचं राज्य आहे. एकीकडे तुम्ही प्रेक्षकाला मारहाण करून बाहेर काढता. एखाद्या महिलेचा विनयभंग केला जातो. मला वाटतं हे कायद्याचं राज्य आहे.”
फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवरून जितेंद्र आव्हाडांवर हल्ला
“जे शाहू-फुले-आंबेडकर यांचं तुम्ही प्रत्येकवेळी नाव घेता. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय. संविधानानुसार सर्वजण समान आहेत. तुम्ही आमदार आहात म्हणून तुम्हाला काही वेगळ्या गोष्टी दिल्या पाहिजे असं काही गरजेचं नाहीये”, असं शितल म्हात्रे म्हणाल्यात.
“मी आमदारकीचा राजीनामा देऊन तुम्ही पोलीस यंत्रणांवर जो दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केलाय. हा खूप हास्यास्पद आहे. प्रत्येक मायभगिनीचं रक्षण करणं, हे सरकारचं काम आहे आणि सरकार हे अतिशय चांगल्या पद्धतीने करतंय”, असंही म्हात्रे यांनी म्हटलंय.
जितेंद्र आव्हाडांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा : नेमकं काय घडलं, पहा ‘त्या’ घटनेचा व्हिडीओ
कोर्टात जाऊन सिद्ध करा, आव्हाडांना म्हात्रेंचा सल्ला
“आपल्याला न्याय मिळत नाही, असं तुम्हाला वाटतं असेल, तर तु्म्ही कांगावा करण्यापेक्षा कोर्टात जाऊन सिद्ध करा. तुम्हाला ही सवय आहे. केतकी चितळेचं प्रकरण घ्या, करमुसे प्रकरण घ्या. त्यात तुम्ही काय केलंय, हे महाराष्ट्राने बघितलंय”, असा टोलाही शितल म्हात्रेंनी लगावलाय.
“खोटा कांगावा करणं. आदळआपट करणं, हा आपला स्वभाव आहे. या स्वभावाप्रमाणे आपण जे काय करताय, ते संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. त्यामुळे उगीच दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नका. कारण पोलीस त्यांचं काम केल्याशिवाय राहणार नाही”, असा अप्रत्यक्ष इशारा शितल म्हात्रेंनी आव्हाडांना दिलाय.
ADVERTISEMENT