Raj Kundra विरोधातल्या चार्जशीटनंतर शिल्पा शेट्टीची पोस्ट, ‘काही निर्णय चुकले पण…’

मुंबई तक

• 10:21 AM • 18 Sep 2021

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आजकाल चर्चेत आहे त्याचं महत्त्वाचं कारण आहे तिचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात झालेली अटक. नुकतंच राज कुंद्राविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फार सक्रिय नसलेली शिल्पा शेट्टी आता पुन्हा सक्रिय झाली आहे. आता या सगळ्याबाबत तिने एक […]

Mumbaitak
follow google news

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आजकाल चर्चेत आहे त्याचं महत्त्वाचं कारण आहे तिचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात झालेली अटक. नुकतंच राज कुंद्राविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फार सक्रिय नसलेली शिल्पा शेट्टी आता पुन्हा सक्रिय झाली आहे. आता या सगळ्याबाबत तिने एक पोस्ट लिहिली आहे जी चर्चेत आहे.

हे वाचलं का?

शिल्पा शेट्टीच्या पोस्टमध्ये नेमकं काय ?

शिल्पा शेट्टीने केलेली पोस्ट ही पाहून तुम्हीही चकीत व्हाल. या पोस्टमध्ये एका पुस्तकाचं पान शेअर करण्यात आलं आहे. त्यावर 17 डिसेंबर ही तारीख आहे. या पोस्टमध्ये शिल्पा शिल्पा शेट्टी म्हणते काही चुकीचे निर्णय घेतले गेले पण आता मी भूतकाळ मागे सोडून पुढे जाऊ इच्छिते. माझ्याकडून झालेल्या चुका मला पुन्हा करायच्या नाहीत. त्यापेक्षा मी त्या चुकांमधून शिकून पुढे जाऊ इच्छिते. माझ्यासोबत आणि माझ्या आसपास वावरणाऱ्या लोकांसोबत मी पूर्वीप्रमाणेच सहजतेने वागू इच्छिते.

कुणीही झालेल्या गोष्टी बदलू शकत नाही पण एक नवी सुरूवात तर करू शकतोच. कुणीही आत्ता या क्षणापासून सुरूवात करू शकतं आणि त्याचा एक चांगला शेवटही असू शकतो. या नोटसहीत शिल्पा शेट्टीने हार्ट इमोजीही काढला आहे.

सध्या शिल्पा शेट्टीचा कठीण काळ सुरू आहे. राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगात आहे. अशात शिल्पा शेट्टीवरही काही आरोप लावले जात आहेत. शिल्पा शेट्टीला बरंच ट्रोलही करण्यात आलं त्यावरही तिने उत्तर दिलं होतं की मी शांत आहे आणि शांतच राहणार असं ठरवलं आहे ट्रोलर्सना उत्तर देणार नाही हे तिने स्पष्ट केलं आहे. अशात आता शिल्पाचीही आणखी एक पोस्ट चर्चेत आली आहे.

काय म्हटलं आहे शिल्पा शेट्टीने चार्जशीटमध्ये?

राजने 2015 मध्ये विआन इंडस्ट्रीज लि. नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीत त्याचे 24.50 टक्के शेअर्स आहेत. सदर कंपनीमध्ये एप्रिल 2015 ते जुलै 2020 या कालावधीत मी संचालक पदावर होते. मात्र नंतर मी या पदाचा राजीनामा दिला. हॉटशॉट अॅप आणि बॉलीफेम या संदर्भात मला काहीही माहित नाही. मी माझ्या कामात व्यस्त असल्याने पती राज कुंद्रा नेमकं काय करत होता हे माहित नाही असं शिल्पा शेट्टीने सांगितलं आहे.

    follow whatsapp