‘शिवसेना फोडण्यासाठी एजंट नेमलेत’; संजय पवारांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप

मुंबई तक

24 Jul 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:54 AM)

उद्धव ठाकरे गटातील शिवसेना फोडण्यासाठी शिंदे गटाकडून एजंटांची नेमणूक करण्यात आल्याचा दावा, कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला आहे. कोल्हापूर येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून अनेक शिवसैनिक हे शिंदे गटाकडे जाताना दररोज पाहायला मिळत आहेत. व्हीप, गटनेतापद, पक्षाचं चिन्ह अशा विविध मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी […]

Mumbaitak
follow google news

उद्धव ठाकरे गटातील शिवसेना फोडण्यासाठी शिंदे गटाकडून एजंटांची नेमणूक करण्यात आल्याचा दावा, कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला आहे. कोल्हापूर येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून अनेक शिवसैनिक हे शिंदे गटाकडे जाताना दररोज पाहायला मिळत आहेत. व्हीप, गटनेतापद, पक्षाचं चिन्ह अशा विविध मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे.

हे वाचलं का?

अशात उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेले पदाधिकारी फोडून आपल्या गटात घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी कोकणातील एजंट कोल्हापुरात सक्रिय केले आहेत, असा दावा संजय पवार यांनी केला आहे. या एजंटमार्फत वेगवेगळी आमिषे दाखवण्यात येत आहेत. आतापर्यंत त्यांनी 17 जणांशी संपर्क केल्याचं पवार यांनी सांगितलं. मात्र, एकही शिवसैनिक त्यांना भुलणार नसल्याचा विश्वास देखील संजय पवार यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर कोणी फुटलाच तर त्याला आक्रमक इशाराही त्यांनी दिलाय.

शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी ही बातमी देण्यासाठी कोल्हापुरात पत्रकार परिषद आयोजित केली होती. दोन-चार दिवसांचा आढावा घेतला, यादरम्यान 16 ते 17 जणांना कोकणातून आलेल्या एजंटांकडून कॉल येतोय. फोनवरून तुम्ही शिदे गटात या, तुम्हाला काय अपेक्षित असेल ते देऊ. पद किंवा इतर समाधान करण्यासाठी आमिषे या एजंटमार्फत दिले जात असल्याचे पवारांनी सांगितले. आत्तापर्यंत इतक्या ऑफर देऊनसुद्धा एकही शिवसैनिक त्यांच्या हाताला लागला नाही, अशी देखील माहिती संजय पवार यांनी दिली.

कोल्हापुरात निष्ठावंत शिवसैनिकांची फळी आहे, त्यामुळे या अमिषाला ते बळी पडणार नाहीत. जर कोणी फसलं तर ते कायमचं फसलं, कारण आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगणार आहोत, जे गेलेत त्यांच्यासाठी मातोश्रीचे दारं कायमचे बंद करा. नाहीतर या लोकांना अशी सवय लागेल. उलट अडचणीत या लोकांनी थांबायला पाहिजे. मात्र, तसं न करता शिवसैक्कांचे कष्ट वाया जात आहेत, उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केला जातोय, अशी चिंता देखील संजय पवार यांनी व्यक्त केली.

शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केलं जात आहे. कायद्याने आपण पडणार आहोत, सरकार टिकणार नाही. म्हणून दोनचं मंत्री ठेवलेत, असा घणाघात देखील संजय पवार यांनी शिंदे गटावर केलीय. छुप्यापद्धतीने एजंट कामाला लावले आहेत, जे प्रायव्हेट नंबरने कॉल करत आहेत. पण आम्ही अजिबात अशा गोष्टी खपवून घेणार नाही, असं देखील संजय पवार यांनी ठणकावून सांगितलं.

    follow whatsapp