ठाण्यात दिवाळी पहाट ‘शिंदे गटाची’ होणार! ठाकरे गटाला उच्च न्यायालयाचा धक्का

मुंबई तक

• 10:20 AM • 19 Oct 2022

ठाणे : ठाण्यातील तलावपाळीत यंदा ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम शिंदे गटाचा होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेच्या वतीनं शिंदे गटाला देण्यात आलेली परवानगी योग्य असल्याचं निरीक्षण नोंदवून राजकीय हेतूनं निर्णय घेतल्याचा आरोप खोडून काढला. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्यामार्फत मागील १० वर्षांपासून तलावपाळी भागात दिवाळी पहाटचा कार्यक्रम घेण्यात येतो. मात्र, यावर्षी शिंदे गटातील […]

Mumbaitak
follow google news

ठाणे : ठाण्यातील तलावपाळीत यंदा ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम शिंदे गटाचा होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेच्या वतीनं शिंदे गटाला देण्यात आलेली परवानगी योग्य असल्याचं निरीक्षण नोंदवून राजकीय हेतूनं निर्णय घेतल्याचा आरोप खोडून काढला.

हे वाचलं का?

ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्यामार्फत मागील १० वर्षांपासून तलावपाळी भागात दिवाळी पहाटचा कार्यक्रम घेण्यात येतो. मात्र, यावर्षी शिंदे गटातील युवासेनेचे पदाधिकारी नितीन लांडगे यांच्या माध्यमातून याच ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या परवानगीसाठी महापालिका आणि पोलिसांकडे अर्ज करण्यात आला होता. त्यामुळे दसरा मेळाव्यानंतर दोन्ही गट पुन्हा आमने-सामने आले होते.

ठाणे महापालिकेकडून शिंदे गटाला परवानगी :

याबाबत बोलताना नितीन लांडगे म्हणाले, युवासेनेच्या माध्यमातून मागील १० वर्षे मी पत्रव्यवहार करत आलो आहे. त्याच माध्यमातून यंदा देखील एक महिना आधीच १९ सप्टेंबर रोजीच परवानगी मागितली, आणि नियमानुसार पालिकेने, पोलिसांनी परवानगी दिली, अशी माहिती त्यांनी दिली.

यानंतर ठाणे महानगरपालिकेने दिलेल्या परवानगीच्या निर्णयाला आव्हान देत मंदार विचारे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेत राजकीय हेतूनं निर्णय घेतल्याचा आरोप ठाणे महापालिकेवर करण्यात आला होता. मात्र ‘युवासेना कुणाची? या वादात आम्हाला पडायचं नाही’ असं म्हणतं आम्ही गुणवत्तेच्या आधारावर दिलेली परवानगी योग्य ठरवतो असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. तसंच महापालिकेनं दिलेला निर्णयही न्यायालयानं योग्य ठरवला.

    follow whatsapp