ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर ठाणे जिल्ह्यात शिंदे समर्थकांनी बॅनर लावून पाठिंबा दर्शवला होता. तर आता काही शिवसैनिकांनी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे उल्हासनगर येथील गोलमैदान परिसरात असलेल्या कार्यालयाची तोडफोड केल्याचा व्हिडिओ अता समोर आला आहे. या घटनेनंतर काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात येत आहेत. तर अता काही ठिकाणी विरोध देखील होताना दिसत आहे.
ADVERTISEMENT
ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे बोलले जाते. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे हे मंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत. उल्हास नगरमधील गोल मैदानात असलेल्या या कार्यालयाची दुपारी दोनच्या सुमारास शिवसैनिकांनी तोडफोड केली. उल्हासनगरमध्ये शिवसेनेत आधीच दोन गट आहेत, यापूर्वीही शिवसेनेला विरोध झाला आहे. त्यामुळे तिथे भाजपची सत्ता आली. उल्हासनगरचे आमदार भाजपचे आहेत, पालिकेचे सभापतीही भाजपचे आहेत. उल्हासनगर वर्षानुवर्षे शिवसेनेचे आहे बोलले जाते पण तेथील मतदार जैन, गुजराती आणि सिंधी असल्याने त्यांची पहिली पसंती मोदीजी म्हणजेच भाजप आहे.
शिवसेनेचे आमदार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाला आव्हान देत बंड पुकारलं आहे. २१ जूनला हे एकनाथ शिंदे यांच्यासह ३६ पेक्षा जास्त आमदारांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. सध्या अपक्ष आणि शिवसेनेच्या एकूण आमदारांची शिंदे गटाची संख्या ही ४६ पेक्षा जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी उलथापालथ झाली. या सगळ्याचा परिणाम आता राज्यातल्या महाविकास आघाडीवर पाहण्यास मिळतो आहे.
Arvind Sawant : एकनाथ शिंदे आणि बंडखोरांनी शिवसेनेचे दरवाजे स्वतःसाठी बंद केले आहेत
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दोन भाषणं केली. त्यांना कोरोना झाल्याने त्यांची ही भाषणं ऑनलाइन होती. त्यातून त्यांनी भावनिक आवाहन हे शिवसैनिकांना केलं आहे. त्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेले पाहण्यास मिळत आहेत. दुसरीकडे शिंदे गटाने आमचीच शिवसेना खरी आहे असं म्हणत शिवसेना बाळासाहेब ठाकरे असं नाव त्यांच्या गटाला दिलं आहे. गुलाबराव पाटील, दीपक केसरकर यांच्यासह अनेक दिग्गज हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत.
एकनाथ शिंदे यांचं बंड कुठल्या दिशेने जाणार? काय आहेत सात शक्यता?
राज्यातलं महाविकास आघाडी सरकार हे या बंडामुळे अडचणीत आलं आहे. कारण शिवसेनेत पक्ष नेतृत्वाच्या विरोधात सर्वात मोठं बंड हे एकनाथ शिंदे यांनी पुकारलं आहे. शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांनाच आव्हान देत आम्हीच खरे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा वारसा पुढे घेऊन जाणारे शिवसैनिक आहोत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे बंडखोरी केलेल्या शिवसैनिकांविरोधात पडसाद उमटताना दिसत आहेत.
ADVERTISEMENT