एकनाथ शिंदेंचे परतीचे दोर शिवसेनेनं कापले?; मोठ्या पदावरून केली हकालपट्टी

मुंबई तक

• 09:34 AM • 21 Jun 2022

पक्षाविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदेंवर शिवसेनेनं पहिली कारवाई केली आहे. शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर आमदार अजय चौधरी यांची गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागण्याआधीच शिवसेना नेत्यांच्या गर्दीतून गायब झालेल्या एकनाथ शिंदे थेट सुरतला जाऊन पोहोचले. सकाळी समोर आलेल्या या माहितीने राज्यातील राजकीय […]

Mumbaitak
follow google news

पक्षाविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदेंवर शिवसेनेनं पहिली कारवाई केली आहे. शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर आमदार अजय चौधरी यांची गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागण्याआधीच शिवसेना नेत्यांच्या गर्दीतून गायब झालेल्या एकनाथ शिंदे थेट सुरतला जाऊन पोहोचले. सकाळी समोर आलेल्या या माहितीने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, यामुळे सरकारच्या अस्थिरतेवर परिणाम होण्याची शक्यता दिसत आहे.

शिंदेंचं बंड: ‘या परिस्थितीतून मार्ग निघेल यावर मला पूर्ण विश्वास’, शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये?

गुजरातमधील सुरतमध्ये असलेल्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे हे मुक्कामला असून, त्यांच्यासोबत जवळपास २० पेक्षा अधिक आमदार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या मंत्री, आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेसमोर नवं संकट उभं केलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेनेलाच आव्हान दिल्यानं शिवसेनेकडून त्यांच्याबद्दल काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागलं होतं. शिवसेनेकडून पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह दोन नेते सुरतच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, त्यापूर्वीच शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Eknath Shinde: ‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, आम्हाला…’, एकनाथ शिंदेंच्या ट्विटनं खळबळ

नगर विकास मंत्री असणारे एकनाथ शिंदे शिवसेनेचे विधिमंडळातील गटनेते होते. मात्र, शिवसेनेनं आता त्यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली आहे. शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना बाजूला केल्यानंतर गटनेते पदाची जबाबदारी शिवडीचे आमदार अजय चौधरी यांच्याकडे दिली आहे.

२०१९ च्या घटनेमुळे टाकलं सावध पाऊल

एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील आमदारांचा एक मोठा गट घेऊन भाजपला जाऊन मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. गुजरातचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांची व्यवस्था केल्याचा आरोप शिवसेनचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे भाजपसोबत जाण्याचीच शक्यता असून, शिवसेनेनं सावध पाऊल टाकलं आहे.

एकनाथ शिंदे गुजरातमध्येच का गेले?; संजय राऊतांनी घेतलं चंद्रकांत पाटलांचं नाव

२०१९ मध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांनासोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी अजित पवार गटनेते होते. एकनाथ शिंदे हे गटनेते असल्याने त्यांना व्हीप काढण्याचा अधिकार होता. त्यामुळे शिवसेनेनं गटनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे.

    follow whatsapp