Shiv Sena Controversy Akola : अकोला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या (CM Eknath Shinde) ठाण्यात शिवसेनेच्या एका स्थानिक नेत्याच्या हत्येची घटना ताजी असतानाच आता अकोल्यात शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप (Vitthal Sarap Attack) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. बुधवारी रात्री 11 वाजता हा प्रकार घडला. शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी विठ्ठल सरप यांनी खदान पोलीस ठाण्यात जवाब नोंदवला आहे, मात्र अद्यापही गुन्हे दाखल झाले नाहीयेत. (shiv sena dispute attack on district Chief vitthal sarap in akola former MLA Gopikishan Bajoria)
ADVERTISEMENT
अकोल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप (Vitthal Sarap Attack) यांच्या राहत्या घरावर रात्री तोडफोड आणि हल्ल्याची गंभीर घटना घडली. रात्री 11 वाजता हा प्रकार घडलाय. हा प्रकार पक्षाचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) यांच्या इशाऱ्यावरूनच झाल्याचा गंभीर आरोप सरप यांनी यावेळी केला आहे. तसेच जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून गोपीकिशन बाजोरियांना हटविल्यानंतर ही घटना घडलीय.
पोलीस भरती: तृतीयपंथींना ‘मैदानी’तून डावललं, शिंदे सरकारकडून कोर्टाचा अपमान केल्याचा आरोप
जिल्ह्यातील शिंदे गटात गेल्या दोन महिन्यांपासून पक्षांतर्गत गंभीर वाद सुरू होता. या वादातच जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून गोपीकिशन बाजोरियांना हटविल्याची घटना घडली होती. या घटनेनंतरच अकोल्यात बाजोरिया गट विरूद्ध इतर हा शिवसेनेतील वाद तोडफोड आणि मारहाणीवर गेला होता. विठ्ठल सरप यांचं गोरक्षण मार्गावरील सहकारनगर भागात घर आहे.या घरावर बाजोरिया समर्थकांनी घरी हैदोस घातला.
दरम्यान या घटनेनंतर जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप कुटूंबियांसह रात्री बाजोरिया गटाविरूद्ध पोलीस तक्रारीसाठी खदान पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी सरप आणि कुटुंबियांचा जवाब नोंदविला आहे. बाजोरिया समर्थक उपजिल्हाप्रमुख योगेश बुंदेले, प्रकाश पाटील यांच्यासह पाच जणांकडून तोडफोड करण्यात आल्याचा आरोप सरप यांनी केला आहे. तसेच सरप यांना धक्काबुक्की झाल्याचाही आरोप होतोय. या प्रकरणी खदान पोलिसांनी सरप कुटूंबियांचा जवाब नोंदविलाय. मात्र अद्यापही गुन्हे दाखल झाले नाहीयेत.
या घटनेने अकोल्यात शिवसेनेतील वाद विकोपाला पोहोचला आहे. तसेच आता बाजोरिया समर्थकांवर गुन्हे दाखल होतात की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Kasba Peth: कसब्यात कोण मारणार बाजी?
शिवसेनेच्या नेत्याची हत्या
ठाण्यातील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जांभळी नाका, पेढा मारुती मंदिरासमोर 28 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास रवींद्र मच्छिन्द्र परदेशी (वय 49 वर्ष) यांच्यावर काही अज्ञात इसमांनी डोक्यात चॉपरच्या साहाय्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. रवींद्र परदेशी हे शिवसेनेच्या उपविभाग प्रमुख पदावर होते. त्यांना तात्काळ ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी रवींद्रला मृत घोषित केले.
ADVERTISEMENT