शाहू महाराजांनी सत्य समोर आणलं आहे त्यामुळे आता भाजपची कोंडी झाली आहे. भाजपने संभाजीराजे यांचा सत्ता गैरवापर केला. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र छत्रपती शाहू महाराजांनी देवेंद्र फडणवीस यांचा मुखवटा फाडला असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला.
ADVERTISEMENT
संभाजीराजेंनी अपक्ष लढावं ही देवेंद्र फडणवीस यांचीच खेळी, शाहू छत्रपतींचा दावा
काय म्हणाले आहेत संजय राऊत?
“शिवसेनेने कधीच छत्रपती घराण्याचा अपमान केला नाही हे जे शाहू महाराज म्हणाले तो आम्हाला अंबाबाईने दिलेला आशीर्वादच आहे.आता तरी भाजपने शहाणं व्हायला हवं. आम्ही संभाजीराजेंना सन्मानाने पक्षात बोलवत होतो. पण भाजपने संभाजीराजेंचा गैरवापर केला. आज शाहू महाराज यांनी त्यांचा बुरखा फाडला. त्याबद्दल मी शाहू महाराजांचे आभार मानतो. शिवसेनेने कधीच छत्रपती घराण्याचा अपमान केला नाही. भाजपने कारस्थान करून शिवसेनेला बदनाम करण्याचं काम केलं. तसंच भाजपने समाजात तेढ निर्माण करण्याचाही प्रयत्न केला.’ असंही संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.
“छत्रपती शिवरायांचं स्मरण करून…”वडील शाहू महाराजांच्या ‘त्या’ दाव्यानंतर संभाजीराजेंचं ट्विट!
काय म्हणाले शाहू महाराज?
छत्रपती घराण्याचा या सगळ्यात अपमान वगैरे झाला असा काही प्रश्न येत नाही हे राजकारण आहे. माझ्यापर्यंत काही विषय आला असता तर गोष्ट वेगळी होती. मात्र तसं काही झालं नाही. संभाजीराजेंना उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा संबंध आला नाही. त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली. संभाजीराजेंना माघार घ्यावी लागणं हा छत्रपतींच्या घराण्याचा अपमान आहे अशी चर्चा रंगू लागली होती त्याला आज शाहू महाराजांनी हे उत्तर दिलं आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संभाजीराजेंनी भेट घेतली. त्यानंतर एक-ते दोन दिवसातच आपण अपक्ष लढू असं जाहीर केलं. देवेंद्र फडणवीस आणि संभाजीराजे यांच्यात काय चर्चा झाली ते मला माहित नाही. मात्र अर्धा तास चर्चा झाली याचा अर्थ काहीतरी विषय झाला असेलच. महाविकास आघाडीसोबत गेलात तर तुम्हाला पाठिंबा कसा देता येईल? त्यापेक्षा तुम्ही अपक्ष लढा आम्ही पाठिंबा देतो असं संभाजीराजेंना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं असेल त्यामुळे ही त्यांचीच खेळी होती असं म्हणता येईल असंही शाहू महाराजांनी म्हटलं आहे.
आणखी काय म्हणाले संजय राऊत?
आम्ही बोललो की देशद्रोह होतो, आम्हाला ईडीची भीती दाखवली जाते. आम्ही प्रश्न विचारले की घरी ईडी पाठवली जाते. चालू न झालेल्या रिसॉर्टमधलं पाणी समुद्रात जातं म्हणून ईडीने धाड टाकली. ईडीची कितीही भीती दाखवली तरीही शिवसेना झुकणार नाही असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. संजय राऊत म्हणाले की आधी महागाईवर चर्चा होत होती पण आता अजान आणि टोपीवर चर्चा होते आहे.
आज देशातली महागाई तीनशेपटीने वाढली आहे. बेरोजगारी वाढली आहे, मात्र या प्रश्नांवर कुणी बोलत नाही. महागाईवर विचारलं की उत्तर प्रदेशातल्या ज्ञानवापी मशिदीबाबत बोललं जातं. देशाला दरवर्षी दोन कोटी रोजगार मिळणार होते त्या आश्वासनाचं काय झालं? असंही संजय राऊत यांनी विचारलं आहे.
ADVERTISEMENT