शिवसेना: ‘BJP फक्त तुमचा..’ ठाण्यातील राड्यानंतर संजय राऊत संतापले

मुंबई तक

07 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 04:55 PM)

Sanjay Raut expressed anger: मुंबई: ऐन होळीच्या (Holi) दिवशी ठाण्यातील शिवाई नगर परिसरातील शिवसेना शाखा (Shiv Sena Shakha) ताब्यात घेण्यावरून ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांना भिडले. यावेळी या संपूर्ण परिसरात तुफान राडा झाला. ज्यावरून आता शिवसेना (UBT) पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. यावेळी संजय राऊतांनी शिंदे गटाला इशारा […]

Mumbaitak
follow google news

Sanjay Raut expressed anger: मुंबई: ऐन होळीच्या (Holi) दिवशी ठाण्यातील शिवाई नगर परिसरातील शिवसेना शाखा (Shiv Sena Shakha) ताब्यात घेण्यावरून ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांना भिडले. यावेळी या संपूर्ण परिसरात तुफान राडा झाला. ज्यावरून आता शिवसेना (UBT) पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. यावेळी संजय राऊतांनी शिंदे गटाला इशारा देताना असंही म्हटलं की, ‘भाजप त्यांचा फक्त वापर करून घेत आहेत. भविष्यात त्यांना कळेल की, त्यांनी केवढी मोठी चूक केली आहे ते.’ (shiv sena sanjay raut was furious after the controversy over shiv sena shakha in thane)

हे वाचलं का?

ठाण्याच्या राड्यानंतर राऊतांनी शिंदेंना सुनावलं

‘ज्या पद्धतीने हे लोकं पोलीस, सत्तेचा वापर करून जे काही खेचून घेत आहेत ते आम्ही परत आणू. ही फक्त काही दिवसाची बाब आहे. ही सत्ताही राहणार नाही, आणि दादागिरी देखील चालणार नाही. पोलिसांचा जो वापर होतोय आमच्या लोकांसाठी त्याचा अर्थ असा की, आपण घाबरला आहात. हिंमत असेल तर समोर येऊन लढा. तेव्हा काय ते आम्ही पाहू. सरकार तर पडणार आहेच.. सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्याची आम्ही वाट पाहतोय.’

‘ठाण्यात अशा काही घटना घडत आहे. कारण या गटाचं अस्तित्व ठाण्यापुरतंच आहे. ठाण्याच्या बाहेर काही नाही. लवकरच ते सुद्धा संपेल. फार काळ टिकणार नाही. विशेषत: खेडच्या सभेनंतर सर्वांच्या पायाखालच्या जमिनी सरकल्या आहेत. आता उद्धव ठाकरे महाराष्ट्रभरात जातील.’

‘कसबा किंवा चिंचवड निर्णयनंतर भाजप किंवा मिंधे गट असेल दुसरं काय करणार.. आमचा जो शिवसैनिक आहे तो कुठेही मागे हटणार नाही.’

Thane : ठाकरे विरुद्ध शिंदे गटात जोरदार राडा; ऐन होळीच्या दिवशी शिवसैनिकांचा शिमगा

‘मी त्यांनाही सांगतोय ठाण्यात जे चाललंय ते थांबवा.. सत्ता आज आहे उद्या नाही. भाजप जो तुमचा वापर करतेय ते तुम्हाला कळेल भविष्यात.. की तुम्ही किती मोठी चूक केली आहे. शिवसैनिकांवर हल्ले करून तुम्ही शाखा ताब्यात घेत असाल तर ते मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीला शोभणारं नाही. असा शुभ संदेश या निमित्ताने मी त्यांना देतो.’ असं म्हणत संजय राऊत यांनी कालच्या घटनेबाबत संताप व्यक्त केला.

शिंदे गट शिवसेना भवनासाठी उद्धव ठाकरेंना भिडणार?; गिरीश महाजनांनी काय विधान केलं?

ठाण्यात नेमकं काय घडलं?

ठाण्यातील शिवाईनगर परिसरात ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये काल (7 मार्च) रात्री आठ वाजता जोरदार राडा झाला. शिवाई नगरची शाखा ताब्यात घेण्याच्या कारणावरुन हा संपूर्ण राडा झाला. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी कुलुप तोडून शिवाई नगरची शाखा ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल शिवाई नगर शाखेजवळ नरेश म्हस्केंच्या नेतृत्वात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नजीकच असलेल्या शिवाईनगर शाखेचं कुलुप तोडून म्हस्केंसह काही कार्यकर्ते हे आत गेले आणि त्यांनी आतच मुक्काम ठोकला. ही बातमी कळताच संतप्त झालेले ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते हे शिवाई नगर शाखेबाहेर जमा झाले. यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते हे आमने सामने आले. दरम्यान, यावेळी घटनास्थळी पोलिसांची मोठी कुमक तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

शिंदे आणि ठाकरे गट पुन्हा आमनेसामने! धारावीत सदा सरवणकर आणि शिवसैनिकांची बाचाबाची

    follow whatsapp