“देशात तेवढेच करायचे बाकी”, उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पुन्हा डिवचलं

मुंबई तक

12 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 04:40 PM)

Uddhav Thackeray, Narendra Modi, Gautam Adani, ED raids : ईडी, सीबीआयच्या विरोधकांवरील धाडी, चौकशा आणि अटक सत्रावरून शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. विरोधकांकडून सातत्याने अदानींवरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न होत आहे. शिवसेनेनंही याच मुद्द्यावर बोट ठेवत मोदींना डिवचलं आहे. (Shiv Sena UBT attacks Modi Government over ed, Cbi raids) […]

Mumbaitak
follow google news

Uddhav Thackeray, Narendra Modi, Gautam Adani, ED raids : ईडी, सीबीआयच्या विरोधकांवरील धाडी, चौकशा आणि अटक सत्रावरून शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. विरोधकांकडून सातत्याने अदानींवरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न होत आहे. शिवसेनेनंही याच मुद्द्यावर बोट ठेवत मोदींना डिवचलं आहे. (Shiv Sena UBT attacks Modi Government over ed, Cbi raids)

हे वाचलं का?

सामना अग्रलेखातून शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोदी सरकारच्या काळाची आणीबाणीपेक्षाही भयंकर स्थिती असं वर्णन केलं आहे.

सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, “देशाने 1975 च्या कालखंडात इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी अनुभवली आहे. त्या काळ्याकुट्ट कालखंडास लाज वाटावी इतक्या बेगुमान पद्धतीने भाजपचे राज्यकर्ते आज वागत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा बेकायदेशीर वापर करून राजकीय विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचे कार्य अखंड सुरू आहे. ही अघोषित नव्हे, तर घोषित हुकूमशाही देशात सुरू झाल्याची लक्षणे आहेत. गेल्या दोन दिवसांत विरोधी पक्षांतील अनेकांवर ‘ईडी’ने छापे मारले व काहींना अटका केल्या, पण या अशा सर्व कारवायांपासून भाजपचे अतिप्रिय गौतमभाई अदानी सर्व करून सवरून मोकळे आहेत. त्यांना मोदी सरकारने सुरक्षेची विशेष कवचकुंडले बहाल केली आहेत.”

Corrupt Manus एकनाथ शिंदे : आदित्य ठाकरेंनी सांगितला CM शब्दाचा नवीन अर्थ

“याचा काय अर्थ घ्यायचा?”, शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काय म्हटलंय?

“नितीश कुमार व तेजस्वी यांनी हातमिळवणी करून बिहारात भाजपच्या पायाखालची सतरंजी ओढली व सरकार पाडले. तेव्हापासून यादवांना आम्ही धडा शिकवू, अशी भाषा भाजपचे लोक करीत होते. धडा शिकवण्यासाठी 2013 चे एक प्रकरण उकरून काढले व लालूंच्या कुटुंबावर धाडी घातल्या. लालू यांची नातवंडे, गर्भवती सून यांना 16 तास घेरून ठेवले व गर्भवती सूनबाई त्या तणावामुळे मूर्च्छा येऊन पडल्या. 2013 च्या प्रकरणात ‘ईडी’ अशा पद्धतीने कारवाई करते, पण एलआयसी, स्टेट बँक बुडवणाऱ्या अदानी यांच्या वाटेला जायचे धाडस करत नाही. याचा काय अर्थ घ्यायचा?”, असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

“महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी गेल्या काही काळापासून ‘ईडी’चे धाडसत्र सुरू आहे. मुश्रीफ यांच्या पत्नी या प्रकारामुळे उद्विग्न झाल्या व म्हणाल्या, ‘एकदाच काय त्या आम्हाला गोळय़ा घाला व मोकळे व्हा!’ केंद्रीय यंत्रणा ज्या निर्घृण पद्धतीने काम करीत आहेत, त्याबाबतचा हा संताप आहे. महाराष्ट्रात असंख्य साखर कारखान्यांत हिशेबाचे घोळ आहेत, पण त्यातील अनेक कारखान्यांना फडणवीस-शिंदे सरकारचे अभय असल्याने ‘ईडी’ त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही”, असं म्हणत ठाकरे गटाने मोदी सरकारला धारेवर धरलं.

“हे एकदा फडणवीस यांनीच सांगावे; अमित शहा, बोला”, संजय राऊतांचा थेट सवाल

“…मग गौतम अदानी वगैरे लोकांचे हिशेब त्यांना लागले काय?”

राज्यातील ईडी, सीबीआयच्या कारवायांवर भाष्य करताना सामनात म्हटलं आहे की, “सहकार क्षेत्रातील अनेक बरबटल्या हातांचा पाठिंबा फडणवीस सरकारला आहे, पण कारवाई फक्त मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबावरच होत आहे. साई रिसॉर्टप्रकरणी खेडचे सदानंद कदम यांना अटक करून ‘ईडी’ने काय साधले? खेडची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची सभा यशस्वी व्हावी म्हणून सदानंद कदम यांनी मेहनत घेतली व सभा संपताच पुढच्या 72 तासांत ‘ईडी’ने त्यांना अटक केली. काही व्यवहारांचे हिशेब ‘ईडी’ला लागत नाहीत व तपासात सहकार्य नाही म्हणून अटक केली जाते. मग गौतम अदानी वगैरे लोकांचे हिशेब त्यांना लागले काय?”

“अदानी यांनी एलआयसीला साठ हजार कोटींना बुडवले. ही जनतेच्या पैशांची अफरातफर आहे आणि हा पैसा परदेशात ‘खोका’ कंपन्यांमार्फत गेला व परत आला. अशा सर्व बोगस कंपन्यांचे हिशेब ‘ईडी’ आणि सीबीआयला लागले काय? अदानी यांना वाचवण्यासाठी व अदानी भ्रष्टाचारावरील जनतेचे लक्ष उडवण्यासाठी विरोधकांवरील कारवाईने जोर पकडला आहे. संसदेचे अधिवेशन आज सुरू होत आहे. विरोधकांनी गौतम अदानी व मोदी यांच्या भ्रष्ट संबंधांविषयी प्रश्न विचारू नयेत म्हणून विरोधकांवर धाडी घातल्या. आता विरोधक अदानींवर प्रश्न विचारण्याऐवजी स्वतःवरच्या कारवाईतच गुंतून राहतील व सरकारला त्यावर जाब विचारतील. हा एक डाव आहे. त्यांचा तो कावा विरोधकांनी समजून घेतला पाहिजे”, असं म्हणत शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरोधकांना सल्ला दिला आहे.

Shiv Sena : बाळासाहेबांनी शिंदेंना दिला धनुष्य-बाण; शिवजयंतीदिनी विशेष देखावा

“हिटलरला लाज वाटेल”, मोदी सरकारवर टीकास्त्र

ठाकरे गटाने म्हटलं आहे की, “मोदी सरकार व भाजप नेत्यांची कुटुंबे भ्रष्टाचाराच्या चिखलात संपूर्ण बरबटली आहेत. भाजपास हजारो कोटी रुपयांच्या देणग्या अज्ञात स्रोतांकडून मिळाल्या. त्याचे मायबाप हे भ्रष्टाचारी आहेत. पी. एम. केअर्स फंड म्हणजे सरकारी फसवणूकच आहे. त्याचे साधे ऑडिट करायला कोणी तयार नाही, पण राजकीय विरोधकांना, त्यांच्या कुटुंबांना छळले जात आहे. हिटलरला लाज वाटेल अशा पद्धतीचे राजकीय अमानुष हत्यासत्र सध्या सुरू आहे. हिटलरने ज्यूंना गॅस चेंबरमध्ये कोंडून मारले. आता आपल्या देशात राजकीय विरोधकांबाबत तेवढेच करायचे बाकी आहे.”

“हुकूमशाहीचा अंत होईल”, इतिहासाचा दाखला देत शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काय म्हटलं आहे?

“विरोधकांना कायमचे संपवायचे व लोकशाहीचाही मुडदा पाडायचा, हे ठरवूनच देशात राज्य चालवले जात आहे. या सरकारने सर्व घटनात्मक संस्था आपल्या टाचेखाली घेतल्या, निवडणूक आयोग खिशात घातला, न्यायालयात आपली माणसे नेमून घेतली. मग उरले काय? आता संविधानही बदलले जाईल किंवा हवे तसे नवे संविधान लिहून घेतले जाईल असेच वातावरण आहे. लालू यादव, मनीष सिसोदिया यांनी परखडपणे सांगितले, ‘‘कितीही छळ करा, आम्ही गुडघे टेकणार नाही.’’ महाराष्ट्रात संजय राऊत, अनिल देशमुख, नवाब मलिक यांनीही गुडघे टेकले नाहीत. सगळेच मिंधे नाहीत. बरेच जण ताठ पाठवण्याचे, स्वाभिमानी आहेत. देशाला तोपर्यंत भय नाही. या स्वाभिमानातूनच क्रांतीच्या ठिणग्या पडतील आणि केंद्रीय सत्तेकडून होत असलेला अन्याय संपून जाईल. हुकूमशाहीचा अंत होईल. इतिहास तेच सांगतो”, असा इशारा अग्रलेखातून मोदी सरकारला दिला आहे.

    follow whatsapp