Thackeray यांचा प्लॅन, कदम पिता-पुत्रांना धक्का? बड्या नेत्याची घरवापसी?

मुंबई तक

21 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:14 AM)

Sanjay Kadam vs MLA Yogesh Kadam and Shiv Sena: दापोली: शिवसेनेचे (Shiv Sena) दिग्गज नेते एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंड केलं. ज्यामध्ये ठाकरेंना सर्वाधिक फटका कोकणात (Konkan) बसला आहे. येथील सहा आमदार शिंदेंसोबत गेले आहेत. त्यापैकीच एक आमदार म्हणजे माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे पुत्र योगेश कदम (Yogesh Kadam). पण आता त्यांनाच घेरण्यासाठी […]

Mumbaitak
follow google news

Sanjay Kadam vs MLA Yogesh Kadam and Shiv Sena: दापोली: शिवसेनेचे (Shiv Sena) दिग्गज नेते एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंड केलं. ज्यामध्ये ठाकरेंना सर्वाधिक फटका कोकणात (Konkan) बसला आहे. येथील सहा आमदार शिंदेंसोबत गेले आहेत. त्यापैकीच एक आमदार म्हणजे माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे पुत्र योगेश कदम (Yogesh Kadam). पण आता त्यांनाच घेरण्यासाठी ठाकरे गटानं (Thackeray Group) रणनिती आखली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) एका बड्या नेत्याला पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हा नेता नेमका कोण? त्यामुळे दापोली (Dapoli) मतदारसंघातली राजकीय समीकरणं कशी बदलणार? ठाकरेंच्या या रणनितीवर योगेश कदम यांना काय वाटतं? हेच आपण सविस्तर जाणून घेऊया. (shiv sena will give political strength to sanjay kadam against ramdas kadam son mla yogesh kadam)

हे वाचलं का?

दापोली मतदारसंघ हा शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बालेकिल्ला आहे. इथं गेल्या वेळी योगेश कदम निवडून आले. पण, कदम शिंदे गटात गेले. त्यामुळे त्यांना आव्हान देणारा तगडा चेहरा ठाकरेंनी शोधून काढला आहे. त्यासाठी माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते संजय कदम हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

संजय कदम हे मूळचे शिवसेनेचे.. पण 2014 साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या तिकीटावर ते आमदारही झाले. पण, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत योगेश कदम यांनी संजय कदम यांचा पराभव केला. आता त्यांची ठाकरे गटात घरवापसी होणार असल्याची चर्चा आहे. यावरून योगेश कदम यांनी संजय कदम यांच्यावर टीकाही केली आहे.

रामदास कदमांचे पुत्र आमदार योगेश कदमांच्या गाडीचा भीषण अपघात

पाहा योगेश कदम नेमकं काय म्हणाले:

खेड-दापोलीमधील राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम हे शिवसेनेत (ठाकरे गट) जाणार असल्याच्या चर्चा सुरू शिंदे गटाचे विद्यमान आमदार योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांना याबाबत एक आठवण करुन देताना संजय कदमांवर जोरदार टीकाही केली.

‘संजय कदम या व्यक्तीने भगवा जाळून बाळासाहेबांचे पोस्टर्स फाडून जाळले होते. अशा व्यक्तीला उद्धव ठाकरे स्वीकारायला तयार होतात? संजय कदम शिवसेनेत गेले, तर ही त्यांची राजकीय आत्महत्या ठरेल.’

‘गुहागरचं माकड’; योगेश कदमांचं भास्कर जाधवांना प्रत्युत्तर, शिव संवाद यात्रेची उडवली खिल्ली

‘ते शिवसेनेत जाणार असतील तर ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. ते ज्या दिवशी शिवसेनेत प्रवेश करतील त्या दिवशी मी निवांत झोपेन. कारण मागच्या विधानसभा निवडणुकीवेळीच संजय कदम यांचा प्रवेश करून त्यांना तिकीट देण्यात येणार होतं. अनिल परब त्यांना ‘मातोश्री’वर देखील घेऊन गेले होते. ही बाब खासदार संजय राऊत यांनीच मला सांगितली होती.’ असे आरोप करत योगेश कदम यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवरच टीका केली आहे.

संजय कदम हे मूळचे शिवसैनिक आहेत. आता घरवापसीनंतर त्यांना ठाकरे गटाची ताकद मिळणार आहे. संजय कदम यांची ठाकरे गटात घरवापसी हे योगेश कदम यांच्यासाठी मोठं आव्हान असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याचीही शक्यता आहे.

    follow whatsapp