Mumbai Crime News: भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना दहिसर पूर्व मध्ये घडली आहे. भाजपत पक्षप्रवेश केल्यानंतर अभिनंदनाचा बॅनर लावण्यावरून हा राडा झाला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी लाकडी दांडे, लोखंडी रॉड, चॉपरने मारहाण केली. याप्रकरणी भाजपचा एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून, या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, इतरांचा शोध सुरू आहे.
ADVERTISEMENT
शिवसेना कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या भाजप कार्यकर्त्याचं नाव बिभीषण विश्वनाथ वारे (वय 40) असं आहे. त्यांच्यावर सुख सागर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.
बिभीषण वारे यांनी हे 14 वर्षांपासून प्रकाश सुर्वे यांच्यासोबत शिवसेनेत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी विधान परिषदेतील भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. त्यानंतर ही घटना घडली आहे.
लाखडी दांडे, लोखंडी रॉड, चॉपरने मारहाण, दहिसरमध्ये काय घडलं?
बिभीषण वारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दहिसर पूर्व येथे नवनाथ नावाडकर यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर अशोकवन जंक्शन, चिंतामणी प्लाझा समोर बिभीषण वारे यांनी अभिनंदनाचा बॅनर लावला. तिथे पूर्वी आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक बॅनर लावलेला होता. भूमिपूजनाचा कार्यक्रम संपलेला असल्याने वारे यांनी त्या ठिकाणी हा बॅनर लावला.
रिक्षात अश्लील चाळे; प्रेमी युगुलाला हटकलं, प्रियकराने टाकला रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड अन्…
बॅनर लावल्यानंतर रात्री सुमारे 11.15 वाजता बिभीषण वारे हे आर.के. चायनिजच्या बाजूला अनिल गिंबल याला भेटायला गेले. तिथे सुनील मांडवे हे गेले. त्यांनी अभिनंदनाचा बॅनर काढून प्रकाश सुर्वे यांचा बॅनर लावा, असं त्यांनी सांगितलं. त्यावर तुम्हीच तसे करा असं वारे यांनी त्यांना सांगितलं.
त्यानंतर 19 मार्च रोजी रात्री 1.30 वाजता शिवसेनेचे शाखाप्रमुख सुनील मांडवे यांनी बिभीषण वारे यांना केला. तुझा बॅनर काढून ठेवला असून, घेऊन जा असं मांडवे यांनी वारेला सांगितलं. त्यावर सकाळी माझा बॅनर मी दुसरीकडे लावतो असं वारे यांनी सांगितलं.
Crime news: ओव्हरटेक केलं म्हणून महिलेला मारहाण; नागपूरमधील लाजिरवाणी घटना
दरम्यान, रात्री 1.35 वाजता अनिल दबडे हा (रा. मागाठाणे, बोरिवली पूर्व) बिभीषण वारेंना भेटला. त्यानंतर सुनीलसोबत काय बोलणं झालं आहे. त्यावर वारे म्हणाले की, सुनीलने माझा बॅनर काढला असून, तुझ्याशी वाद घालायचा नाही, असं सांगितलं.
त्यानंतर 1.45 वाजता सुनील मांडवे, आशिष नायर, नितेश उत्तेकर, सोनु पालंडे, मयुर वाघेला, समीर कोटी, अनिल दबडे हे आले आमि त्यांनी काहीही न बोलता लाखडी दांडा, लोखंडी रॉड आणि चॉपरने मारहाण केली. त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत वारे हे मित्राकडे गेले आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Crime: पत्नीचा एक टोमणा, पतीने कुऱ्हाडीने केले तुकडे, बाळालाही संपवलं
या प्रकरणी पोलिसांनी सुनील मांडवे, आशिष नायर, नितेश उत्तेकर, सोनु पालंडे, मयुर वाघेला, समीर कोटी, अनिल दबडे यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT