बेळगाव: शिवसेना पदाधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचे कोल्हापुरात पडसाद

मुंबई तक

• 12:42 PM • 13 Mar 2021

कर्नाटकातील शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद आता कोल्हापुरातही उमटायला लागले आहेत. शिरोळकर यांच्या गाडीवर कन्नड वेदिका रक्षकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापुरात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देणगे यांच्यासह शिवसैनिकांनी कर्नाटकातील एसटी बसना काळं फासून आपला निषेध नोंदवला. रेखा जरे हत्या : …अशा प्रकारे बाळ […]

Mumbaitak
follow google news

कर्नाटकातील शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद आता कोल्हापुरातही उमटायला लागले आहेत. शिरोळकर यांच्या गाडीवर कन्नड वेदिका रक्षकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापुरात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देणगे यांच्यासह शिवसैनिकांनी कर्नाटकातील एसटी बसना काळं फासून आपला निषेध नोंदवला.

हे वाचलं का?

रेखा जरे हत्या : …अशा प्रकारे बाळ बोठे पोलिसांच्या जाळ्यात अडकला

इतकच नव्हे तर शिवसेना कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातील दुकानांवर कन्नड भाषेतील फलकांनाही काळं फासलं. बेळगावमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांवर हल्ले थांबले नाहीत तर कर्नाटकची एकही बस महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा संजय पवार यांनी दिला. दरम्यान या घटनेनंतर संतप्त झालेल्या एका कर्नाटकच्या युवकाने सकाळी मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या असलेल्या एसटी बसवर दगडफेक केली. बेळगावात दिपक शिरोळकर यांच्यावर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करुन गाडीची काच फोडली होती. यानंतर कोल्हापुरात या घटनेचे पडसाद पहायला मिळाल्यानंतर दोन्ही राज्यांतील एसटी सेवेवर याचा परिणाम झालेला पहायला मिळाला.

शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे कोल्हापूर आगारातून एकही बस बेळगावच्या दिशेने गेली नाही. याचसोबत बेळगावातूनही एकही बस कोल्हापुराच्या दिशेने आली नाही. दोन्ही राज्यातील बस स्थानक प्रमुखांनी चर्चा करुन हा निर्णय घेतल्याचं समजतंय. दरम्यान या घटनेचे पडसाद राजकीय स्तरावरही पहायला मिळाले आहेत. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप-सभापती निलम गोर्हे यांनी शिरोळकर यांना केंद्रीय पथकामार्फत सुरक्षा पुरवण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे.

    follow whatsapp