लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर महाराष्ट्रात या घटनेच्या निषेधार्थ बंदची घोषणा करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी एकत्र या बंदची घोषणा केली. राज्यात आज काही ठिकाणी या बंदला हिंसक वळणही लागलं. सत्ताधारी पक्षातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन दमदाटी आणि हिंसेचा वापर करत दुकानदारांना आपली दुकानं बंद करण्यास भाग पाडलं.
ADVERTISEMENT
चंद्रपुरात शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शिवभोजन थाळीलाही याचा फटका बसला आहे. आंदोलनकर्त्या शिवसैनिकांनी शिवभोजन थाळी पुरवणाऱ्या हॉटेलची तोडफोड केली आहे.
चंद्रपूरच्या मुख्य बस स्थानकासमोरील शिवभोजन थाळी पुरवणारं हॉटेल आज सुरु होतं. शिवसैनिकांनी या हॉटेलमध्ये शिरुन सामानाची नासधुस करत तोडफोड केली. तयार झालेले खाद्यपदार्थ आणि काही काचेच सामान फोडत शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला. इतकच नव्हे तर शिवभोजन थाळीच्या फलकाचीही शिवसैनिकांनी नासधूस केली.
Maharashtra Bandh: शरद पवारांच्या आग्रहामुळे शिवसेनेची फरफट, आजचा बंद फसला – चंद्रकांत पाटील
याव्यतिरीक्त रिलायन्स ट्रेंड्ज हे मॉलवजा दुकानही आंदोलकांनी आजच्या बंददरम्यान फोडलं. या घटनेनंतर चंद्रपुरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. बंदची घोषणा करताना तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी शांततेत हा बंद पाळला जाईल असं आश्वासन दिलेलं असतानाही राज्यात काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्याच आहेत. तोडफोडीच्या घटनांव्यतिरीक्त आज चंद्रपुरात बंदला संमिश्र प्रतिसाद पहायला मिळाला.
दरम्यान या घटनेनंतर चंद्रपूरचे शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांनी आपली चूक मान्य केली आहे. शिवभोजन केंद्रावर झालेली तोडफोड ही गैरसमजुतीतून झाल्याचं गिर्हे यांनी सांगितलं. दरम्यान शिवभोजन केंद्र चालवणाऱ्या व्यक्तीची माफी मागून त्यांना झालेलं नुकसान भरुन देण्याचं आश्वासन गिर्हे यांनी सांगितलं आहे.
वसुली सुरु आहे की बंद? Maharashtra Bandh वरुन अमृता फडणवीसांचा राज्य सरकारला टोला
ADVERTISEMENT