मशाल उजळली! भगवा फडकला! ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

मुंबई तक

• 10:51 AM • 06 Nov 2022

मुंबई : मधल्या काळातील कपट-कारस्थानानंतरही पहिली निवडणूक झाली. यात आमचं चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं. त्यानंतर आम्ही मशाल चिन्ह घेऊन निवडणूक लढवली. आता मशाल उजळली, भगवा फडकला अशी प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांच्या विजयानंतर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. उद्धव ठाकरे म्हणाले, जनता आमच्यासोबत आहे हे आजच्या निकालाने स्पष्ट केलं. चिन्ह कुठलं पण […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : मधल्या काळातील कपट-कारस्थानानंतरही पहिली निवडणूक झाली. यात आमचं चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं. त्यानंतर आम्ही मशाल चिन्ह घेऊन निवडणूक लढवली. आता मशाल उजळली, भगवा फडकला अशी प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांच्या विजयानंतर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे म्हणाले, जनता आमच्यासोबत आहे हे आजच्या निकालाने स्पष्ट केलं. चिन्ह कुठलं पण असो जनता आमच्यासोबत आहे. ही आता सुरूवात आहे. पण लढाईची सुरुवातच विजयाने झाली आहे. त्यामुळे भविष्यातील लढाईची चिंता नाही. यापुढेही आम्ही असेच एकजुटीने सर्व विजय मिळवू.

तरी १२ हजार मत मिळाली असती… :

यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावरही निशाणा साधला. ते म्हणाले, आमचं नाव आणि चिन्ह गोठवलं. परंतु, ज्या निवडणुकीसाठी चिन्ह गोठवलं ती निवडणूक त्यांनी लढविली नाही. ज्यांनी अर्ज भरला त्यांनी पराभवाचा अंदाज आल्याने माघार घेतली. अधिकृत चिन्हावरही निवडणूक लढवली असती नोटाला जी मतं पडली तीच मतं विरोधकांना पडली असती, अशा टोला ठाकरे यांनी यावेळी लगावला.  

“ऋतुजा लटकेंचा विजय हा निष्ठेचा आणि शिवसैनिकांच्या जिद्दीचा!”

ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून हा निष्ठेचा विजय असल्याचं म्हटलं आहे. आज अंधेरी पोटनिवडणुकीत जो विजय मिळाला तो स्व. रमेश लटके जी यांच्या कार्याचा आहे, निष्ठेचा आहे, शिवसैनिकांच्या जिद्दीचा आहे आणि शिवसेनेवर, उद्धवसाहेबांवर जनतेच्या असलेल्या दृढ विश्वासाचा आहे! या विजयातून निर्माण झालेली उर्जेची लाट महाराष्ट्रभर पसरेल याची खात्री आहे! असं ट्विट करून आदित्य ठाकरे यांनी ऋतुजा लटकेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

    follow whatsapp