हिंगोली : कावड यात्रेत शर्ट काढून दंड थोपटतो. गणपतीच्या मिरवणुकीत कपडे काढून दंड दाखवतो. दोन्ही बाजूंनी वाढलेले केस, अरे काय ते आमदार…. घटनात्मक पद आहे, याची काही किंमत असायला पाहिजे. व्यायाम शाळेत जिथे आपण शरीर साधना करतो तिथे हे मटका, पत्ते खेळतात, ही काय प्रथा आहे. असे म्हणत हिंगोलीचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विनायक भिसे यांनी आमदार संतोष बांगर हिंगोलीचा सलमान खान अशी उपमा दिली.
ADVERTISEMENT
विनायक भिसे शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या उपस्थित सोमवारी झालेल्या जाहीर सभेत बोलत होते. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला म्हणून मटकावाल्याला आमदार केला. पण त्या आमदाची मागणी आहे कि आमच्या जिल्ह्यात एखाद मटका विद्यापीठ करता आलं तर बघा. आमचा विकास काय तर गावोगावी बुके, गावोगावी क्लब, गावोगावी देशीची दुकाने, डुप्लिकेट दारू ही जिल्ह्यातील परिस्थिती आहे.
संदेश देशमुख यांची बांगर यांना मटकावाल्याची उपमा :
यावेळी बोलताना दुसरे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी बांगर यांना मटकावाला तर खासदार हेमंत पाटील यांना गद्दार म्हणून हिणवले. ते म्हणाले, गद्दार हेमंत पाटील याला उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर 25 दिवसात निवडून आणूना खासदार केला. 3.5 लाख मतांची लीड दिली. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची लीड दिली. पण उद्धव ठाकरे यांना मी म्हणालो होतो, हा बेईमान आहे. जिल्ह्यात येत नाही. ही परिस्थिती आहे आणि जे जिल्ह्यात आहे, असे म्हणतं भिसे यांनी शिंदे गटात गेलेल्या खासदार हेमंत पाटील यांचाही समाचार घेतला.
भास्कर जाधव यांचीही संतोष बांगर यांच्यावर टीका :
मला उद्धव ठाकरेंचं एक कळलं नाही, हिंगोलीत इतके चांगले शिवसैनिक असताना हे अस्वल कुठून निवडलं त्यांनी? हा गडी रडला, शाप दिला, शिवसेना सोडून जाणारांच्या पोरांना बायका मिळणार नाहीत म्हणाला आणि बहुमत चाचणीच्या दिवशी त्यांच्या सोबत जाऊन बसला. मला वाटलं तो चुकून गेला असेल तर त्यांच्यातला एक आमदार म्हणला रात्री आम्ही त्याला दाखवला खोका तवा इकडे आला बोका”, असा किस्साही त्यांनी उपस्थितांना सांगितला.
ADVERTISEMENT