‘मला बालिशपणा करायचा नाही’ आदित्य ठाकरेंचं भाजपला खणखणीत उत्तर

मुंबई तक

19 Aug 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:53 AM)

मुंबईतला वरळी हा शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात भाजपने जंगी दहीहंडी घेऊन शक्तीप्रदर्शन केलं आहे. एवढंच काय काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी भेट देत राजकीय बोलणार नाही पण मुंबई महापालिकेतली भ्रष्टाचाराची हंडी नक्की फोडणार असं म्हटलं आहे. तर आशिष शेलार यांनीही आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. मात्र मी मला […]

Mumbaitak
follow google news

मुंबईतला वरळी हा शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात भाजपने जंगी दहीहंडी घेऊन शक्तीप्रदर्शन केलं आहे. एवढंच काय काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी भेट देत राजकीय बोलणार नाही पण मुंबई महापालिकेतली भ्रष्टाचाराची हंडी नक्की फोडणार असं म्हटलं आहे. तर आशिष शेलार यांनीही आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. मात्र मी मला बालिशपणा करायचा नाही म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपला उत्तर दिलं आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे आदित्य ठाकरेंनी भाजपला उद्देशून?

मुंबईतल्या वरळी या ठिकाणी जे जांबोरी मैदान आहे तिथे दहीहंडीचे थर लावून भाजपने राजकारणाचे थर रचलेत का? असं विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले की, “मला आनंद आहे. त्यांनी येऊन वरळी बघावं. वरळी आता सगळ्यांना आवडायला लागली आहे. वरळी ए प्लस झालं आहे. तरीही मी बालिशपणा करणार नाही. ज्यांना कुणाला कुठे उत्सव साजरा करायचा आहे तो करू द्या. आजचा दिवस चांगला आहे कार्यकर्त्यांना एकमेकांसमोर आणून वाद निर्माण करायचा नाही. लोक आनंद घेत आहेत घेऊ द्या.” असं त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून वरळीतलं राजकीय वातावरण हे काहीसं तापलेलं दिसून येतं आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने ही सुरूवातच मानली जाते आहे. वरळीतल्या जांबोरी मैदाना भाजपतर्फे आज दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. युवकांचा उत्साह द्विगुणित होतो आहे. अशात देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली होती. तर भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही आदित्य ठाकरेंवर आणि शिवसेनेवर टीका कोली होती.

काय म्हटलं आहे आदित्य ठाकरेंबाबत आशिष शेलार यांनी?

आम्ही गड वगैरे काही मानत नाही, आदित्य ठाकरे स्वत: आमच्या मतांच्या जिवावर निवडून आले आहेत”, असं म्हणत या वादाला तोंड फोडलं. यानंतर सचिन अहिर यांनी देखील आशिष शेलार यांना खुलं आव्हान देत वरळीतून निवडणूक लढवून जिंकून यायचा सल्ला दिला. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी भाजपला टोला लगावला.

त्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की मला बालिशपणाचं राजकारण करायचं नाही. आजचा दिवस हा चांगला दिवस आहे त्यावेळी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं योग्य नाही.

    follow whatsapp