फडणवीसांनी दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये – दिपाली सय्यद

मुंबई तक

01 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:50 AM)

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या जाहीर सभेत बोलत असताना भोंग्याचा मुद्दा चर्चेत आणल्यापासून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मध्यंतरी देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता यांनी थेट उद्धव ठाकरेंना योगी आदित्यनाथ यांचं उदाहरण देत टीका केली होती. आता या टीकेला शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी उत्तर दिलं आहे. थेट नाव न घेता दिपाली सय्यद यांनी […]

Mumbaitak
follow google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या जाहीर सभेत बोलत असताना भोंग्याचा मुद्दा चर्चेत आणल्यापासून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मध्यंतरी देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता यांनी थेट उद्धव ठाकरेंना योगी आदित्यनाथ यांचं उदाहरण देत टीका केली होती. आता या टीकेला शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी उत्तर दिलं आहे.

हे वाचलं का?

थेट नाव न घेता दिपाली सय्यद यांनी अमृता फडणवीस यांचा उल्लेख म्हैस असा केला आहे. त्या कल्याण येथे महाराष्ट्र दिनाच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या.

संकटात सापडल्यानंतरच शिवसेनेला बाळासाहेबांची आठवण येते – मनसेची बोचरी टीका

अमृता फडणवीसांनी मध्यंतरी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवरुन दिपाली सय्यद यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, “आता यावर काय बोलायचं? फडणवीसांना माझं एवढंच सांगणं आहे की घरात-दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेला सोडू नका. शिवसैनिक कोणालाही ऐकत नाहीत. नाहीतर तुमचं मी पुन्हा येईन, पुन्हा येईनचं स्वप्न हे स्वप्नच राहील.”

“योगी होण्यासाठी देवेंद्र फडणवीस बायकोला सोडणार का?” दीपाली सय्यद यांचा सवाल

न्यू कामगार संघटनेच्या वतीने कल्याणमध्ये आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमीत्त बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात उपस्थित असताना दिपाली सय्यद यांनी भोंग्यांवरुन सुरु असलेल्या राजकारणाबद्दलही भाष्य केलं. “महाराष्ट्रात सर्व जाती-धर्माचे लोक हे गुण्या-गोविंदाने राहतात. भोंग्याच्या मुद्द्यावरुन वाद झाले तर त्याचा त्रास हा सर्वात खालच्या स्तरातील लोकांना होणार आहे. राज साहेबांची आज सभा आहे. त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. आजपर्यंत ते कुठेही विजयी झाले नाहीतर आतातरी विजयी व्हावेत”, असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.

“त्या कारमध्ये सोमय्या काय मोदी असते तरीही ती फोडली असती”

    follow whatsapp