पुण्यातील शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुचिक यांनी आपल्याशी लग्न करण्याचं वचन देऊन शारिरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं, परंतू यानंतर कुचिक यांनी लग्नास नकार दिल्यामुळे पीडित तरुणीने ही तक्रार दाखल केल्याचं कळतंय. तक्रारदार तरुणी ही पुण्याच्या दौंड परिसरात राहणारी आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉ. रघुनाथ कुचिक आणि पीडित तरुणीची ६ नोव्हेंबर २०२० मध्ये फेसबूकवर ओळख झाली. १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत दोघेही एकमेकांशी बोलत होते. या ओळखीचं रुपांत प्रेमात झालं. यानंतर डॉ. कुचिक यांनी तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून शिवाजीनगर आणि अन्य ठिकाणी नेऊन शारिरिक संबंध ठेवले. तरुणी गरोदर राहिल्यानंतर कुचिक यांनी पीडित तरुणीला गर्भपात करायला भाग पाडून याबद्दल कुठेही बोलल्यास तुला मारुन टाकेन अशी धमकी दिली.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; ३२०० बाईक्स तपासत डोंबिवली पोलिसांनी विकृत नराधमाला केली अटक
पीडित तरुणीने या घटनेविरुद्ध शिवाजी नगर पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी डॉ. कुचिक यांच्याविरुद्ध IPC 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर पोलीस या प्रकरणात योग्य ती कारवाई करतील अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक अनिता पाटील यांनी दिली. डॉ. रघुनाथ कुचिक हे शिवसेनेचे उप-नेते असून ते कामगार युनियनचे अध्यक्षही आहेत.
पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
डॉ. कुचिक यांनी या प्रकरणात प्रतिक्रीया देताना बलात्काराचे आरोप फेटाळले आहेत. हा हनीट्रॅपचा प्रकार असल्याचं डॉ. कुचिक यांनी सांगितलं. २४ वर्षीय तरुणीने आपल्याला फेसबूकवर फ्रेंडरिक्वेस्ट पाठवली. ओळख वाढल्यानंतर या तरुणीनेच प्रेम संबंधांसाठी पुढाकार घेतला. कालांतराने या तरुणीने लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्यासाठी आपल्यावर दबाव टाकत करारनामा पाठवला. ज्यात तिच्या नावावर एक फ्लॅट, दर महिन्याला १५ हजार रुपये, हे महिने प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला जमा करायचे यात दरवर्षी १० टक्क्यांनी वाढ करायची असं नमूद केल्याचं डॉ. कुचिक यांनी सांगितलं. या घटनेमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
औरंगाबादमध्ये निर्जन जागी थांबलेल्या कारमध्ये स्फोट, जोडप्याचा होरपळून मृत्यू
ADVERTISEMENT