मालेगावात कारवाईचा ‘बुलडोझर’ पॅटर्न! शिवसेनेचे दादा भुसे उतरले मैदानात

मुंबई तक

• 03:54 AM • 26 Apr 2022

उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात अनधिकृत बांधकामांवर जेसीबी आणि बुलडोझरद्वारे केलेल्या कारवाईचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. भाजपशासित राज्यांमध्ये प्रशासनामार्फत केल्या जाणाऱ्या या कारवाईला वादाची किनारही लाभली आहे. अशातच भाजपच्या या बुलडोझर कारवाईची भुरळ आता शिवसेनेलाही पडली आहे. शिवसेनेचे मंत्री आणि मालेगाव बाह्य मतदारसंघाचे आमदार दादा भुसे यांनी जेसीबीच्या सहाय्याने परिसरातील अवैध धंद्यांच्या अड्ड्यावर कारवाई केली. […]

Mumbaitak
follow google news

उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात अनधिकृत बांधकामांवर जेसीबी आणि बुलडोझरद्वारे केलेल्या कारवाईचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. भाजपशासित राज्यांमध्ये प्रशासनामार्फत केल्या जाणाऱ्या या कारवाईला वादाची किनारही लाभली आहे. अशातच भाजपच्या या बुलडोझर कारवाईची भुरळ आता शिवसेनेलाही पडली आहे.

हे वाचलं का?

शिवसेनेचे मंत्री आणि मालेगाव बाह्य मतदारसंघाचे आमदार दादा भुसे यांनी जेसीबीच्या सहाय्याने परिसरातील अवैध धंद्यांच्या अड्ड्यावर कारवाई केली.

दादा भुसे हे आपल्या धडाकेबाज शैलीमुळे कायम चर्चेत असतात. मतदारसंघातील अवैध धंद्यावर आळा बसवण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याच्या अनेक तक्रारी भुसे यांच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे संतप्त झालेल्या भुसे यांनी प्रशासनाला हाताशी धरत मालेगावातील झोडगे या गावातला जुगाराचा अड्डा जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त केला.

झोडगे गावात एका कार्यक्रमानिमीत्त गेले असताना दादा भुसे यांना स्थानिक नागरिकांनी जुगार अड्ड्याची तक्रार केली. गावातील तरुणांचं आयुष्य व्यसनाच्या आहारी जाऊन भरकटत जात असल्याची तक्रार केल्यानंतर दादा भुससेंनी तात्काळ पोलिसांना सोबत घेऊन या अड्ड्यावर कारवाई केली.

काही महिन्यांपूर्वी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंत्री भुसे यांनी यासारखीच एक कारवाई केली होती. त्यानंतर पुन्हा अशी कारवाई करण्याची वेळ कृषीमंत्री भुसे यांच्यावर आली. त्यामुळे मंत्री महोदयांना असे गैरप्रकार दिसल्यावर ते कारवाई करत असतील तर पोलीस प्रशासन काय करतंय असा सवाल आता मालेगावचे नागरिक विचारत आहेत. परंतू दादा भूसेंनी केलेली ही कारवाई मालेगावात चर्चेचा विषय ठरली होती.

    follow whatsapp