मुंबईत मान्सूनचं आगमन झाल्यानंतर नालेसफाईवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारणाला सुरुवात होते. गेल्या ४ दिवसांपासून शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं. आजही शहरातील अनेक भागांमध्ये नालेसफाई योग्य पद्धतीने झालेली नाही. चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार दिलीपमामा लांडे यांनी अपुऱ्या नालेसफाईमुळे कंत्राटदाराच्या अंगावर कचरा टाकून आपला निषेध व्यक्त केला.
ADVERTISEMENT
Water Logging in Mumbai : नाल्यात कचरा टाकाल तर २०० रुपये दंड – BMC चा निर्णय
चांदीवली भागातील अनेक ठिकाणी नालेसफाई व्यवस्थित झालेली नाही. ज्यामुळे गेल्या ४ दिवसांत या भागात पाणी साचलं. त्यामुळे संतापलेल्या दिलीप लांडे यांनी शिवसैनिकांना सोबत घेऊन कंत्राटदाराच्या माणसाला रस्त्यावर बसवून त्याच्या अंगावर कचरा टाकला. आमदार लांडे यांचा हा प्रताप सोशल मीडियावर नंतर चांगलाच व्हायरल होतो आहे. भाजप नगरसेवकाच्या वॉर्डात आमदार लांडे यांनी हा प्रताप केल्यामुळे यावरुन महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्षातील भाजप पुन्हा समोरासमोर येण्याची शक्यता आहे.
Monsoon in Mumbai : शहरात पावसाची विश्रांती, ढगाळ वातावरण कायम
मी या मतदार संघाचा आमदार आहे. नालेसफाईची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ती लोकं इथे येत नाहीत. लोकांनी विश्वास ठेवून मला आमदार म्हणून निवडून दिलंय. नालेसफाईचं कंत्राट ठेकेदाराला देण्यात आलंय, पण त्याने आपलं काम केलं नाही म्हणून मला रस्त्यावर उतरुन गटार साफ करावं लागतंय. माझ्या मतदार संघातील लोकांना याचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे जो त्रास माझ्या मतदारसंघातील नागरिकांना सहन करावा लागला तो त्रास कंत्राटदाराला झाला पाहिजे म्हणून मी हे काम केल्याचं आमदार दिलीप लांडेंनी सांगितलं.
दरम्यान शिवसेनेच्या या कृत्याचा भाजपने जोरदार निषेध केला असून आमदार राम कदम यांनी ही शिवसेनेची नौटंकी असल्याचं म्हटलंय. शिवसेना महापालिकेत सत्तेत आहे. दरवर्षी नालेसफाईच्या नावावर कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला जातो. आज शिवसैनिक रस्त्यावरुन येऊन कंत्राटदाराला मारहाण करत आहेत. खरी मारहाण त्यांनी नालेसफाईच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांना केली पाहिजे अशी प्रतिक्रीया घाटकोपरचे भाजप आमदार राम कदम यांनी दिली आहे.
हिंदमाता परिसरात पाणी साचलं त्याला स्मृती इराणी जबाबदार – शिवसेना खासदार राहुल शेवाळेंचा दावा
ADVERTISEMENT