राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे गृहमंत्री अमित शहांना गोध्रा प्रकरणात जामीन मिळाल्याचा दावा शिवसेनेचे मुखपत्र सामनाने केला आहे. सामनाच्या रोखठोख या स्तंभात ‘अमितभाई, तुम्ही बोलत रहा! मऱ्हाठा नक्की उठेल! या मथळ्याखाली अमित शहांवर निशाणा साधला आहे. यात अमित शरद पवारांमुळे जामिन मिळाला, असा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. त्यामुळे हे आता चर्चेचा विषय बनत आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलंय सामानाच्या रोखठोकमध्ये?
“अमित शहांना महाराष्ट्राविषयी द्वेष आहे. खरे तर त्यांना महाराष्ट्र आणि मराठी माणसांबद्दल नेहमीच कृतज्ञ असायला हवं. जेव्हा यूपीए सरकार मोदी आणि शहांच्या मागे हात धुवून लागले असताना मोदी आणि पवारांच्या सुसंवादामुळेच अमित शहा यांना गोध्रा हत्याकांडातील एका प्रकरणात जामिनावर मुक्त होण्यास मदत मिळाली. हा गौप्यस्फोट नसून सत्य आहे, असं देखील रोखठोकमध्ये लिहलं आहे. आणखी एका प्रकरणात बाळासाहेब ठाकरे यांनी सरकार पद्धतीने भूमिका करून अमित शहा यांना मदत होईल अशी व्यवस्था केली होती. या दोन्ही प्रसंगावर स्वातंत्र्य लिखाण संजय राऊतच करू शकतील. शरद पवार आणि उद्धव ठाकरे बोलू शकतील. पण त्याच ठाकरे आणि पवारांविरोधात टोकाचे मिशन अमित शाह आणि त्यांचे लोक चालवत आहेत, असा दावा सामनामध्ये करण्यात आला आहे.
‘एका बाजूला मिशन मुंबई तर दुसऱ्या बाजूला मिशन बारामती’
एका बाजूला मिशन मुंबई तर दुसऱ्या बाजूला मिशन बारामतीचे षड्डू ठोकले आहे. महाराष्ट्राचे नेतृत्व पूर्णपणे खतम करायचे आणि तोतयांच्या हाती हे राज्य सोपवायचे, मुंबईचा सरळ घास गिळायचा, असा हा कट शिजला आहे. अमित शहांनी ते स्पष्टपणे बोलून दाखवले, असं रोखठोकमध्ये नमूद करण्यात आलं आहे. शिंदे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आणि राज ठाकरे यांना चुचकारून त्यांनी मुंबईवर नियंत्रण मिळवायचे ठरवले आहे, असं रोखठोकमध्ये लिहलं आहे.
अमित शाहंसह शिंदे समर्थकांचा सामनामधून समाचार
महाराष्ट्रावर मोगल चाल करून आले तेंव्हा येथील काही लोक शिवरायांना साथ देण्याऐवजी मोगलांना रसद पुरवत होते. शिंदे गटाच्या रूपाने तेच आता घडत आहे, असे दिसते. असं सामनाच्या रोखठोकमध्ये म्हटलं आहे. शिंदे गटाच्या मदतीने मुंबई जिंकू, मुंबईवरील महाराष्ट्राचा आणि मराठी अस्मितेचा ठसा नष्ट करू याच मिशनसाठी अमित शहा मुंबईत आले. शिवसेनेची काही माणसे त्यांनी विकत घेतली, पण कसे विकत घेणार? शिंदेंचे लोक अजूनही बाळासाहेबांना मानतात. उद्या वर गेल्यावर बाळासाहेबांना काय सांगणार? मुंबईचा सौदा करून भाजपच्या मिशन मुंबईला रसद पुरवून आम्ही मोठी मर्दानगी केलीय, असं सांगणार का? असा सवाल सामनातून शिंदे गटात गेलेल्यांना विचारण्यात आलाय.
ADVERTISEMENT